57 हजारांचा ऐवज लुटणारा चोरटा अवघ्या 4 तासात अटकेत

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

५७ हजार रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या पंटेमळ-कुडचडे येथील देविदास पालेकर या ४९ वर्षीय चोरट्याला वास्को पोलिसांनी अवघ्या चार तासात अटक केली. 
 

मुरगाव- आल्त दाबोळी येथील विशाल मेगामार्टमध्ये ठेवलेल्या एका बॅगमधील ५७ हजार रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या पंटेमळ-कुडचडे येथील देविदास पालेकर या ४९ वर्षीय चोरट्याला वास्को पोलिसांनी अवघ्या चार तासात अटक केली. 
वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आल्त-दाबोळी येथे असलेल्या विशाल मेगा मार्टमधील बॅगा ठेवणाऱ्या काउंटरवरुन देविदास पालेकर या चोरट्याने सुमारे ५७ हजार रुपयांचा ऐवज असलेली बॅग लंपास केली. 
या बॅगेत ५२ हजार रुपये किंमतीचा स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच आणि रोख रक्कम असा एकूण ५७ हजार रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी वास्को पोलिसांकडे तक्रार करताच पोलिसांनी तपास चक्रे वेगाने हलवून अवघ्या चार तासात चोरट्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीचा ऐवज हस्तगत 
केला.

संबंधित बातम्या