Porvorim News: मंदिरातील घंट्या चोर पोलिसांच्या जाळ्यात; पाच लाखाचे साहित्य जप्त

165 घंटा, 8 समया पोलिसांनी केल्या जप्त
Porvorim News
Porvorim News Dainik Gomantak

भूतकीवाडा-पर्वरी येथे एका व्यक्तीने मंदीरातील साहित्याची चोरी करत ते भंगारवाड्यात असणाऱ्या खोलीत लपवले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी संशयितावर कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले आहे.

(Police arrested two persons who stole material worth five lakh from the temple at Porvorim)

Porvorim News
Goa Mining : खाण कंपन्यांना हायकोर्टाचा दणका

मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी महमद सलमान याने मंदिरातील चोरलेले साहित्य आपल्या खोलीत लपवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानूसार पोलिसांनी महमद सलमान राहणार घोटणी चोव्हाळ- कोलवाळ याच्या भूतकीवाडा-पर्वरी येथील भंगार अड्डा असणाऱ्या भाड्याच्या खोलीतून साहित्य जप्त केले आहे.

Porvorim News
Goa Politics : भाजप विरोधात मोट बांधण्यास विजय सरदेसाईंकडून सुरवात

पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्यामध्ये 165 घंटा, 8 समया इतर मिळून तब्बल 5 लाखाचे साहित्य आहे. या कारवाईत भंगार अड्डा मालकसह राजू सिंग या कामगाराला अटक केली आहे. यांच्याकडे अधिक तपास केला जात असून आणखी काही चोरीत त्यांचा सहभाग होता का ? याचा तपास पोलिस करत आहे.

पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली असून आरोपीने हे साहित्य नेमके कशा प्रकारे मिळवले आहे. तसेच हे साहित्य त्याने चोरी करत मिळवले आहे? की चोरीचे साहित्य अल्प किमतीत विकत घेतले आहे. याचा तापस पोलिसांनी सुरु केला आहे. तसेच अटक केलेले आरोपी थेट चोरीमध्ये सहभागी होते का? याचा ही शोध सुरु असल्याचं यावेळी पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com