पेडण्यातील रेती व्यवसायात चक्क पोलिसांच्याच होड्या!

कशी होणार कारवाई? : होड्यांचे परवाने कोणाच्याही नावे नाहीत!
पेडण्यातील रेती व्यवसायात चक्क पोलिसांच्याच होड्या!
Police boats in sand business in Pernem Dainik Gomantak

मोरजी: पेडणे तालुक्यात तेरेखोल आणि शापोरा या दोन नद्यांमधून बेसुमार रेती उपसा सुरू आहे. सध्या खंडपीठाने फटकारल्यानंतर पोलिसांनी काही होड्यांवर कारवाईही केली. मात्र, काही पोलिसांच्याही होड्या बेकायदेशीर रेती उपसा करीत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेडणे तालुक्यातील तेरेखोल आणि शापोरा या दोन नद्यांमध्ये किमान 500 पेक्षा जास्त होड्या रेती व्यवसायात गुंतलेल्या आहेत. त्यात पोलिसांच्याही होड्या असल्याची खात्रीलायक माहिती आहे. पोरस्कडे देवसू, कोनाडी, केरी तेरेखोल या भागात पोलिसांशिवाय सरकारी अधिकारी, सरकारी कर्मचारी, सरपंच, उपसरपंच यांच्या होड्या आहेत, परंतु त्यांच्या नावावर होड्यांचे परवाने नाहीत. ते या रेती व्यवसायात गुंतलेले आहेत. ज्यावेळी पोलिस रेती व्यवसायांवर कारवाई करतात, त्यावेळी संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंद करतात. मात्र, यंदा कोणती होडी कोणाच्या नावावर आहे, त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केलेला नाही. पोलिसांच्या होड्या असल्याने पोलिस गुन्हे कुणावर नोंद करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.