Goa Latest Update| रुमडामळच्या पंचाविरुद्ध पोलिसात तक्रार

रुमडामळ पंचायतीचे पंच सदस्य उमरान पठाण यांनी हायस्कूलच्या कचेरीत प्रवेश करून कर्मचाऱ्यांशी अपशब्द उच्चारून गैरवर्तणूक केली असल्याची तक्रार दाखल
Goa police
Goa policeDainik Gomantak 

फातोर्डा: रुमडामळ पंचायतीचे पंच सदस्य उमरान पठाण यांनी हायस्कूलच्या कचेरीत प्रवेश करून कर्मचाऱ्यांशी अपशब्द उच्चारून गैरवर्तणूक केली असल्याची तक्रार एआयएम उच्च माध्यमिक हायस्कूलच्या व्यवस्थापकाने मायणा कुडतरी पोलिस स्थानकात केली आहे.

(Police complaint against Panch of Rumdamal in goa)

Goa police
Goa Petrol Diesel Price|वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त?

याविषयी एका व्हिडियोद्वारे खुलासा करताना उमरान पठाण यांनी आपण आरटीआयचा अर्ज सादर करण्यासाठी गेलो होतो. मात्र, व्यवस्थापनाने तो घेण्यास नकार दिल्याने आपण माघारी फिरलो असल्याचे सांगितले.

हे प्रकरण 12 सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात घडले होते. या तक्रारीत नमूद करताना हायस्कूलच्या व्यवस्थापकाने उमरान पठाण यांनी शाळेची परवानगी न घेता कचेरीत प्रवेश करून कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे वागून अपशब्द उच्चारले असल्याचे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com