Atal Setu: स्पीड गननंतर अटल सेतूवर पोलिस देखील कार्यरत, वाहनांच्या वेगावर नजर

Atal setu
Atal setu Dainik Gomantak

पणजी येथील अटल सेतूवर (Atal Setu) मागील आठवड्यात अपघाताच्या दोन घटना समोर आल्या. एका अपघातात पोलिस कॉन्सटेबल संदीप नाईक यांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर जाग आलेल्या प्रशासनाने अटल सेतूवर वाहनांचा वेग तपासण्यासाठी स्पीड गन (सीसीटिव्ही कॅमेरे) (Speed governor gun) बसवली आहे. तसेच, पोलिसांची देखील वाहनांच्या वेगावर नजर असून, दोन वाहतूक पोलिस कर्मचारी सेतूवर कार्यरत करण्यात आले आहेत.

अटल सेतूवर वेग मर्यादा ओलांडून बेभान वाहन चालवणाऱ्यांवर आता गोवा पोलिस कारवाई करताना दिसतील. सेतूवर असणारे पोलिस वेग मार्यादेचे उल्लघंन करणारा वाहनांवर तात्काळ कारवाई करतील. अटल सेतूवरील कॅमेरा वाहनाचा वेग तपासतील, वेग मार्यादा ओलांडणाऱ्या वाहन चालकांना दंडाची पावती पाठवली जाईल. त्यामुळे आता अटल सेतूवरून जाताना वाहानांच्या वेगाचे पालन करावेच लागणार आहे.

Atal setu
गोव्यात रस्ता सुरक्षा निधीचा 24 टक्केच वापर

सध्या वाहनाचे वेग मार्यादा उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दिवसाच कारवाई केली जात आहे. येत्या काळात रात्रीची देखील कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, झुआरी कार अपघातात (Zuari Car Accident) चार गोमंतकीयांचा मृत्यू झाला. तसेच, अटल सेतूवरील देखील अपघातांची श्रुकंला सुरू होती. त्यावरून आता गोवा सरकार अॅक्शन मोड मध्ये आल्याचे दिसत असून, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

Atal setu
काँग्रेसने आदेश दिल्यास गटनेतेपद जरूर स्वीकारू

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com