पर्वरीत पोलिसांचा सन्मान

Dainik Gomantak
मंगळवार, 12 मे 2020

पोलीस कर्मचा-यांच्या पथ संचलन वाहिनीवर पुष्पवर्षाव करून कोरोना लढवय्यांना मानवंदना देण्यात आली.   पर्वरी पोलीस स्टेशनवरील सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी यांचा भेटवस्तू  देऊन गौरव करण्यात आला

पर्वरी

गोवा राज्य कोरोना मुक्त म्हणून घोषित केले असले तरी नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे.  गोवा राज्याच्या सीमा बंद केल्या आहेत तरीपण लोकांनी अनोळखी माणूस दिसला किंवा एखादे घर बंद होते त्या घरात हल्लीच्या दिवसात वर्दळ वाढलेली दिसली तरी पोलीसांकडे संपर्क साधावा.   आपण सतर्क राहिलो तरच सुरक्षित राहू अन्यथा कोरोना व्हायरस पून्हा आपले पाय पसरावयास आपली परवानगी घेणार नाही याची नोंद नागरिकांनी घ्यावी असे उद्बोधन पर्वरी मंडळ अध्यक्ष कुंदा चोडणकर यांनी पर्वरी येथे कोरोना लढवय्ये  पोलीस कर्मचा-यांचे अभिनंदन करून मानवंदना देताना सांगितले.यावेळी पोलीस उपअधिक्षक एडवीन कुलासो, पोलीस  निरिक्षक निनाद देऊलकर,उपनिरिक्षक दिनेश गडेकर, उपनिरिक्षक प्रतीक भट, सिनारी, कॉन्स्टेबल संदीप परब, मकरंद पार्सेकर, हाटले व अन्य शंभर पोलीस कर्मचारी तसेच भाजप उत्तर गोवा अध्यक्ष महानंद अस्नोडकर, गुरुप्रसाद पावसकर, किशोर अस्नोडकर, राजकुमार देसाई, सुभाष कळंगुटकर, सुकुरचे सरपंच संदीप वजरकर, राधिका सावंत,विश्रांती देसाई, गीता कदम व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सुरवातीस पोलीस कर्मचा-यांच्या पथ संचलन वाहिनीवर पुष्पवर्षाव करून कोरोना लढवय्यांना मानवंदना देण्यात आली.   पर्वरी पोलीस स्टेशनवरील सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी यांचा भेटवस्तू  देऊन गौरव करण्यात आला.निनाद देऊलकर यांनी, पर्वरी भाजप मंडळाने कोरोना वारिअर्स गौरव करून आमच्या  कार्याची दखल घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.  सर्व लोकांनी सरकारने सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर आपण सर्व मिळून कोरोना व्हायरसचा पराभव करू शकतो असे सांगितले आणि सर्वांचे आभार मानले.

 

संबंधित बातम्या