Goa Tourist: पर्यटक महिलेविरोधात अदखलपात्र गुन्हा; ओल्ड गोवा चर्चसमोर सुरक्षारक्षकाला केली होती चप्पलने मारहाण

शिवीगाळ, स्पर्श केल्याचा केला होता आरोप
Basilica of Bom Jesus Church Old Goa
Basilica of Bom Jesus Church Old GoaDainik Gomantak

Basilica of Bom Jesus Church Old Goa: जुने गोवे (ओल्ड गोवा) येथील प्रसिद्ध बॅसिलिका ऑफ बोम जिझस चर्चसमोर रविवारी सकाळी मोठा राडा झाला होता. महिला पर्यटक आणि चर्चचे सुरक्षा रक्षक यांच्या मोठा वाद झाला व महिला पर्यटक आक्रमक झाली.

यावेळी महिलेने सुरक्षारक्षकावर शिवीगाळ आणि स्पर्श केल्याचा आरोप करत चप्पल मारले होते. दरम्यान, आता या पर्यटक महिलेविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. (Goa Tourist)

Basilica of Bom Jesus Church Old Goa
Save Goa Save Mhadai: मुख्यमंत्री सावंत हे सूर्याजी पिसाळ, कर्नाटकात जाऊन केलेला प्रचार पूर्णतः गोवाद्रोह

सकाळी दहा वाजता हे चर्च पर्यटकांसाठी खुले केले जाते. सकाळी नऊच्या दरम्यान, संबधित पर्यटक चर्चसमोर आले. त्यांनी आत जाण्याची परवानगी मागितली. त्यावरून महिला पर्यटक आणि चर्चचे सुरक्षा रक्षक यांच्यात वाद झाला.

त्यानंतर वाद टोकाला जाऊन महिला पर्यटकाने सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ केली. महिलेसोबत असणारा पुरूष देखील सुरक्षा रक्षकांसोबत वाद घालत होता. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली. या भांडणाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

चर्च खुले होण्याच्या दोन वेगवेगळ्या वेळा ऑनलाईन दिसतात. त्यातून अनेक पर्यटकांचा संभ्रम होतो. ऑनलाईन हे चर्च सकाळी 8 वाजता खुले होत असल्याचे दाखवत आहे. तर, गोवा पर्यटन खात्याच्या संकेतस्थळावर चर्च खुले होण्याची वेळ रविवारी सकाळी 10.30 आणि इतर दिवशी सकाळी नऊ वाजता दिसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com