Goa Police बेस्ट! ज्येष्ठ नागरिकांना दिलं जातयं 'ज्येष्ठ नागरिक कार्ड'

Vasco Police Inspector Kapil Nayak: वास्को पोलीस निरीक्षक कपिल नायक वास्को पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांच्या घरांना भेट देऊन ज्येष्ठ नागरिक कार्ड प्रदान करतात.
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

Goa Police: ज्येष्ठ नागरिकांसाठी कम्युनिटी पोलिसींगचा एक भाग म्हणून पोलीस उपअधीक्षक राजेश कुमार आणि वास्को पोलीस निरीक्षक कपिल नायक वास्को पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांच्या घरांना भेट देऊन ज्येष्ठ नागरिक कार्ड प्रदान करतात.

दरम्यान, पोलीस (Police) उपअधीक्षक राजेश कुमार आणि वास्कोचे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या नेतृत्वाखाली वास्को पोलिसांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह वास्को पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेष्ठ नागरिकांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. पोलीस उपअधीक्षक कुमार आणि पोलीस निरीक्षक नायक यांनी जेष्ठ नागरिकांच्या (Citizens) वैयक्तिक समस्या आरोग्या विषयी चर्चा केली आणि त्यांना पोलीस विभागाकडून आवश्यक असेल तेव्हा सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.

Goa Police
Goa Police: ड्रग्‍स, सायबर गुन्‍ह्यांप्रकरणी नवी व्यूहरचना

दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिकांसाठी कम्युनिटी पोलिसिंगचा एक भाग असून त्यांच्या भेटीदरम्यान जेष्ठ नागरिकांना पोलीस अधीक्षक यांचे फोन नंबर असलेले छापील सीनियर सिटीजन कार्ड देण्यात आले. जेणेकरून जेष्ठ नागरिक त्यांच्या मदतीसाठी पोलिसांना केव्हाही बोलावू शकते. पोलिसांच्या या सेवेबद्दल जेष्ठ नागरिकांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले. फोटो : कम्युनिटी पोलिसिंगचा एक भाग म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करताना पोलीस उपाधीक्षक राजेश कुमार आणि पोलीस निरीक्षक कपिल नायक.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com