Goa police: अमली पदार्थविरोधी कारवाईचा धडाका सुरूच; हणजूण, मडगाव येथील तिघे जेरबंद

दोन कारवाईत पोलिसांनी तब्बल 1.25 लाखाचे अमली पदार्थ केले जप्त
Gold Jewellery Thief Arrested
Gold Jewellery Thief Arrested Dainik Gomantak

गोवा पोलिसांनी अमली पदार्थ विरोधातील कारवाईचा धडाक सुरुच ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी हणजूण व मडगाव येथे कारवाई केल्या आहेत. या दोन कारवाईत पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. यामध्ये तब्बल 1.25 लाखाचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.

(Police have arrested three people in a drug operation in Anjuna and margao)

Gold Jewellery Thief Arrested
Illegal Construction: गोवा खंडपीठाची धडक कारवाई; नियमबाह्य बांधकाम पाडण्याचा आदेश

मिळालेल्या माहितीनुसार आज हणजूण पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. अटक केलेल्या संशयितांची नावे लीलेश कश्यप (मध्य प्रदेश) व अरविंद पाटील (32, हडफडे) अशी आहेत. तसेच कारवाई दरम्यान 55 हजाराचा गांजा जप्त केला आहे.

Gold Jewellery Thief Arrested
Anjuna: हल्ल्याच्या तपासाची केस डायरी सादर करा; न्यायालयाचे हणजूण पोलिसांना निर्देश

याच प्रकारे पोलिसांनी मडगाव येथे आज कारवाई केली आहे. या कारवाईत संशयिताकडून 70 हजाराचा गांजा जप्त केला आहे. तसेच संशयित इस्साक रेगन परेरा असे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संशयित अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर मडगाव येथे सापळा लावत त्याला अटक केली आहे.

गोवा पोलीस राज्यभरात करत असलेल्या वेगवेगळ्या कारवाईत प्रतिमहिना सुमारे 45 किलो अमली पदार्थ जप्त करताहेत. त्यामुळे पोलिस प्रशासन आता पुन्हा सक्रिय झाले असून कारवाईचा वेग देखील वाढवला आहे. तसेच पोलिसांनी अमली पदार्थाविरोधात सामान्य नागरीकांमध्ये जनजागृती करत अशा कारवाईत त्यांची मदत आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com