
म्हापसा: हणजूण पोलिसांनी आणखी एका बेकायदा मसाज पार्लरवर छापा टाकला आहे. पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. (Police have now raided another illegal massage parlour)
पोलिसांच्या माहितीनुसार, कारवाई ही हणजूणमध्ये दि. ९ रोजी, ‘अल्गा सेंटर फॉर आयुर्वेदिक अॅण्ड हिलिंग’ या कथित आस्थापनावर करण्यात आली. पोलिसांनी याठिकाणी छापा टाकत आस्थापनाचे व्यवस्थापन सांभाळणारे विष्णू पुथेपेरुम्बिल (Tamil Nadu) आणि झ्विंगली अमीद (Kerala) यांच्याकडे कागदपत्रांची विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडे आवश्यक परवाने नव्हते. पोलिसांनी पंचनामा करीत, याचा सविस्तर अहवाल हा उपविभागीय दंडाधिकार्यांना पाठवला आहे. यावेळी शिवोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्यधिकारी साधना शेट्ये या उपस्थित होत्या. तसेच पोलीस (Police) निरीक्षक विक्रम नाईक हे सुद्धा सहकार्यांसोबत उपस्थित होते.
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी डिमेलोवाडा-हणजूण येथे अशाचप्रकारे पोलिसांनी कारवाई केली होती. नंतर, हे आस्थापन जिल्हाधिकार्यांच्या निर्देशानुसार बंद करण्यात आले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.