दिलीप मेथर खून प्रकरणी पोलिसांनी सात संशयितांविरुध्द केला गुन्हा दाखल

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

 पर्वरी येथील दिलीप मेथर याचा खूनप्रकरणी पर्वरी पोलिसांनी सात संशयितांविरुद्ध ५०६ पानी आरोपपत्र म्हापसा सत्र न्यायालयात आज सादर केले.

तोर्डा : पर्वरी येथील दिलीप मेथर याचा खूनप्रकरणी पर्वरी पोलिसांनी सात संशयितांविरुद्ध ५०६ पानी आरोपपत्र म्हापसा सत्र न्यायालयात आज सादर केले. पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रात तपास अधिकाऱ्यासह ७१ साक्षीदार आहेत. खून व कटकारस्थानच्या आरोप संशयितावर ठेवण्यात आले आहे. 

त्यामध्ये अल्ताफ येरेगटी, शैलेश शेट्टी, शफी शेख ऊर्फ खय्यद, पवन बडिगर, प्रशांत दाभोळकर ऊर्फ भैय्या, संतोष पिंगळे व इक्बाल नानपुरी याचा समावेश आहे. १४ ऑक्टोबर रोजी दिलीप याचा खून करण्यासाठी सुपारी देण्यात आली होती. १४ ऑक्टोबर २०२० रोजी तो तोर्डा येथे दुपारच्या सुमारास घरी परतत असताना त्याचा पाठलाग करून त्याच्यावर जळीत द्रव्य फेकून जाळण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये हा खून सुपारी देऊन आल्याचे उघड झाले होते. त्यातील एका संशयिताचे आमदाराशी जवळचे संबंध असल्याने हा आमदारही त्यावेळी चर्चेत आला होता.GOa news craim

संबंधित बातम्या