पोलिस हवालदार लाडू गावस यांना राष्ट्रपती पोलिस पदक

विलास महाडिक
शनिवार, 15 ऑगस्ट 2020

ते सध्या वाळपई येथील पोलिस प्रशिक्षण स्कूलमध्ये (पीटीएस) सेवेत असून प्रशिक्षण देण्याचे काम करत आहेत.

पणजी

स्वातंत्र्यदिनानिमित्त देशातील पोलिसांना त्यांच्या विशेष सेवा व कामगिरीसाठी राष्ट्रपती पोलिस पदक देण्यात येते. यावर्षी गोव्यातील पोलिस खात्याचे हवालदार लाडू गणेश गावस (बकल क्रमांक ४२१४) यांना हे जाहीर झाले आहे. ते सध्या वाळपई येथील पोलिस प्रशिक्षण स्कूलमध्ये (पीटीएस) सेवेत असून प्रशिक्षण देण्याचे काम करत आहेत.
पोलिस खात्यातील ३३ पोलिस तुकडीतील ते पोलिस कर्मचारी आहेत. तेव्हा त्यांना या तुकडीतील अष्टपैलू पोलिस कॉन्स्टेबल म्हणून घोषित करण्यात आले होते. १९९२ साली ते सेवेत रूजू झाले होते. २०१३ साली त्यांना हवालदारपदी बढती मिळाली. ते अत्यंत हुशार व प्रामाणिक पोलिस म्हणून खात्यात परिचित आहेत. त्यांना लेखा व प्रशासनाचे उत्तम ज्ञान आहे. नव्याने भरती झालेल्या पोलिस कॉन्स्टेबल्सना तसेच अबकारी व तुरुंग खात्यातील कर्मचाऱ्यांना प्राथमिक ज्ञानाचे प्रशिक्षण देण्याचे काम ते करत आहेत. त्यांच्या पोलिस सेवेतील सुमारे २५ वर्षे ही पोलिस प्रशिक्षण केंद्रातच गेली आहेत.

संपादन- अवित बगळे

 

 

संबंधित बातम्या