Cyber Crime: सायबर गुन्हे रोखण्यासाठी गोवा पोलिस सज्ज !

गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाबरोबर तंत्रज्ञानाच्या देवाण-घेवाण संदर्भात केलेल्या केलेल्या करारामुळे पोलिस अधिकाऱ्यांना तपासकामात अधिक मदत होणार आहे.
Cyber Crime
Cyber CrimeDainik Gomantak

Cyber Crime: जगामध्ये नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पोलिस तपासकामासाठी कायदेशीर बाब व तंत्रज्ञान याची सांगड असणे महत्वाचे आहे.

सायबर गुन्ह्यामध्ये तंत्रज्ञानाच्या येणाऱ्या अडचणींसाठी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाची मदत तसेच तपासकामाच्या दृष्टीने नवीन प्रोजेक्ट तयार करण्यासाठी काल गोवा पोलिस व गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यामध्ये सामंजस्य करार (एमओयू) झाला.

पणजी पोलिस मुख्यालयात झालेल्या या सामंजस्य करारावर पोलिस महासंचालक जसपाल सिंग व महाविद्यालाचे प्राचार्य आर. बी. लोहानी यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

Cyber Crime
Quepem Bridge: देवसा-केपे येथे नवीन पूल उभारणार

या कार्यक्रमावेळी पोलिस उपमहानिरीक्षक अस्लम खान, अधीक्षक निधीन वाल्सन, अधीक्षक शिवेंदू भूषण व अधीक्षक सुचेता देसाई उपस्थित होते.यावेळी बोलताना महासंचालक जसपाल सिंग म्हणाले की, गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाबरोबर तंत्रज्ञानाच्या देवाण-घेवाण संदर्भात केलेल्या केलेल्या करारामुळे पोलिस अधिकाऱ्यांना तपासकामात अधिक मदत होणार आहे.

देशात सायबर गुन्ह्यांत वाढ होत आहे. तपासासाठी कोणते तंत्रज्ञान हवे, हे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मदतीने कळणार आहे, असे सिंग यांनी सांगितले.

पोलिस खातेही ‘पेपरलेस’च्या दिशेने!

आता 5जी मोबाईल इंटरनेट सुविधा येत आहे त्यामुळे तंत्रज्ञानात अधिक गती येणार आहे. त्यामुळे अनेक आव्हानेही पोलिसांसमोर सायबर गुन्ह्यांमुळे उभी राहणार आहेत. डीजीटल व्यासपीठावरून नव्या क्लृप्त्या लढवून आर्थिक गंडा घातला जात आहे.

याच्या तपासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे. अनेकदा पोलिसांना या नव्या तंत्रज्ञानाची माहिती नसते ती या कारारामुळे उपलब्ध होणार आहे.

शिवाय पोलिस खात्यासाठी या कारारामुळे नवनवीन प्रोजेक्ट तयार करून घेतले जातील जे तपासकाम तसेच दैनंदिन कामासाठी उपयोगी पडू शकतील. गोवा पोलिस खात्यात ‘ई ऑफिस’ प्रोजेक्ट करण्याचाही विचार आहे त्यामुळे कागदपत्रांचा वापर कमी होईल,असे सिंग म्हणाले.

Cyber Crime
Film Festival: गोव्यात 31 मे रोजी तंबाखूविरोधी चित्रपट महोत्सवाचे आयोजन

पोलिसांसाठीही अभ्यासक्रम सुरू होणार !

गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयात तंत्रज्ञान विभागात अनेक तज्ज्ञ आहेत. या तंत्रज्ञानाची माहिती व त्यासंदर्भातचे अभ्यासक्रमही पोलिसांसाठी सुरू करण्यात येतील.

भविष्यात आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक आव्हाने समोर येणार असल्याने त्याला तोंड देण्यासाठी अगोदरच त्याची तयारी करण्याची गरज आहे. राज्यातील रस्ते अपघात ही समस्या आहे

ती समस्या कमी करण्यासाठी वाहतूक व्यवस्थापन पद्धत तयारीसाठी इलेक्ट्रॉनिक आणि बांधकाम अभियांत्रिकी विभागाची मदत घेतली जाणार आहे, असे मत प्राचार्य आर. बी. लोहानी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com