Goa Police: 16 जूनपासून भरतीला सुरुवात; 913 पदांसाठी तब्बल 16 हजार अर्ज

Goa Police: 16 जूनपासून भरतीला सुरुवात; 913 पदांसाठी तब्बल 16 हजार अर्ज
goa police.jpg

पणजी: पोलिस खात्यामधील (Police Department) कॉन्स्टेबल पदासाठी गेल्या मार्चमध्ये दिलेल्या जाहिरातीनुसार येत्या 16 जूनपासून भरतीप्रक्रियेला (Recruitment process) सुरवात होत आहे. 913 पदासाठी सुमारे 16 हजार अर्ज आले आहेत. त्यामुळे एका पदासाठी 18 उमेदवार स्पर्धा करणार आहेत. ही नोकरभरती होत असल्याबद्दल उमेदवारांमध्ये उत्साह आहे, मात्र ऐन पावसाळ्यात ही शारीरिक चाचणी घेतली जात असल्याने त्यांच्यामध्ये भीतीही आहे.(Police recruitment in Goa starts from June 16)

पोलिस खात्याने मार्चमध्ये दिलेल्या जाहिरातीत 852 कॉन्स्टेबलपदासाठी अर्ज मागविले होते. त्यातील 720 पदे पुरुषांसाठी तर 137 पदे महिलांसाठी आहेत. अर्ज स्वीकारण्याची तारीख 31 एप्रिल होती. खात्यामध्ये आणखी काही जागा रिक्त झाल्याने खात्याने 913 पदांची नव्याने जाहिरात दिली. त्यामध्ये 767 पुरुषांसाठी तर 146 महिलांसाठी असल्याचे नमूद केले होते. या पदांसाठी 23 हजार अर्ज उमेदवारांनी खरेदी केले होते त्यापैकी 16 हजार जणांनी अर्ज भरले आहेत. त्यामध्ये पुरुष उमेदवारांचे सुमारे 12500 तर महिला उमेदवारांचे सुमारे 3500 अर्ज आले आहेत, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. (Goa) 

येत्या 16 जूनपासून पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी सुरू करण्यात येणार असल्याचा आदेश पोलिस अधीक्षक (मुख्यालय) अभिषेक धानिया यांनी काढला आहे. या शारीरिक चाचणीमध्ये उंची, छाती व वजन याच्या व्यतिरिक्त धावणे, लांब उडी, उंच उडी तसेच 800 मीटर्स व 400 मीटर्स धावण्याचा समावेश आहे. धावण्यामध्ये काही विशिष्ट वेळेतच अंतर पार करणारेच पुढील फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. या नोकरभरतीसंदर्भातचे पत्रे संबंधित उमेदवारांना पाठवण्यात आली आहेत त्यामध्ये या चाचणीचे ठिकाण व वेळ नमूद करण्यात येईल, असे आदेशात धानिया यांनी म्हटले आहे.                                          

‘धावण्या’ची चाचणी!
जून महिन्यापासून राज्यात माॅन्सून सुरू होत असल्याने शारीरिक चाचणीमध्ये समावेश असलेल्या ‘धावणे’ या प्रकारामध्ये काही अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याने उमेदवारांमध्ये नाराजी आहे. ज्या ठिकाणी ही धावण्याची चाचणी घेतली जाणार आहे, त्या ठिकाणी मैदान पावसामुळे निसरडे झाले असल्यास उमेदवारांना धावताना इजा तसेच काहीजण घसरून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही चाचणी ऐन पावसाळ्यात घेताना पोलिस खात्याने विचार करण्याची गरज आहे, असे मत कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज केलेल्या काही उमेदवारांनी या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com