गोवा वेटरन्स संघटनेची निषेध सभा पोलिसांनी उधळली

वार्ताहर
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

मुंबईत शिवसेना कार्यकर्त्यांनी नौदलाच्या निवृत्त कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाण प्रकरणी वास्को रेल्वे स्थानकासमोर आयोजित निषेध सभा जिल्हाधिकाऱ्‍यांची परवानगी नसल्याने पोलिसांनी उधळून लावली. त्यामुळे आता परवानगी घेतल्यानंतरच निषेध सभेची तारीख ठरविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष सुरजित सिंग यांनी सांगितले.

दाबोळी: मुंबईत शिवसेना कार्यकर्त्यांनी नौदलाच्या निवृत्त कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाण प्रकरणी वास्को रेल्वे स्थानकासमोर आयोजित निषेध सभा जिल्हाधिकाऱ्‍यांची परवानगी नसल्याने पोलिसांनी उधळून लावली. त्यामुळे आता परवानगी घेतल्यानंतरच निषेध सभेची तारीख ठरविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष सुरजित सिंग यांनी सांगितले.

शुक्रवारी मुंबईत कांदिवली येथे माजी नौदल वेटरन्स राहत असलेल्या इमारतीजवळ पाच शिवसैनिक येऊन मदन शर्मा (वय ६२) याला इमारतीखाली बोलावून नंतर त्याला लाथाबुक्क्यांनी मारून घायाळ केले होते. नंतर शर्मा यांच्या कुटुंबाने केलेल्या तक्रारीनुसार त्यांना अटक करून नंतर दोन तासाच्या आत जामिनावर सोडण्यात आले.

या मारहाण प्रकरणी गोवा वेटरन्स असोसिएशनतर्फे रविवारी संध्याकाळी ६.०० वा. वास्कोत रेल्वे स्थानकासमोर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कोविड महामारी व कायदेशीर परवानगी न घेतल्याने या सभेस वास्को पोलिसांनी हरकत घेतली. तेव्हा निर्णयाअंती  वेटरन्सतर्फे निषेध सभा रद्द करण्यात आली.

गोवा वेटरन्सचे अध्यक्ष सुरजित सिंग यांना याविषयी विचारले असता, आम्ही फौजी देशाच्या रक्षणासाठी असून आम्हाला कोणती पार्टी किंवा नेता लागत नाही. आम्ही देशसेवेसाठी असून शुक्रवारी आमच्या वेटरन्सवर जो हल्ला झाला ही खूप वाईट गोष्ट आहे. आमच्या गोव्यात तीन संघटना आहेत. तसेच भारतभर ६० लाखाहून अधिक वेटरन्स आहेत.

सर्वांना स्थानिक सरकारतर्फे सुरक्षा देणे क्रमप्राप्त आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच जिल्हाधिकाऱ्‍यांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर परवानगी घेऊन आम्ही वास्कोत निषेध सभा घेणार असल्याचे ते म्हणाले.

संबंधित बातम्या