Sangolda : सांगोल्डा रेस्टॉरंटमधील धांगडधिंगाणा पोलिसांना भोवला

मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे त्वरित कारवाई
Goa police
Goa police

पणजी: एखाद्या पोलिसाविरुद्ध तक्रारी आल्यास त्‍याची क्वचितच चौकशी होते. जर चौकशी झाली तर सुद्धा ती काही दिवसांनी बंद केली जाते व कारवाई होणे हे दूरच असते. पोलिस आपल्याच सहकाऱ्यावर कारवाई करण्यास चालढकलपणा करतात. सांगोल्डा (Sangolda) येथील रेस्टॉरटमध्ये पोलिसांनी घातलेल्या धांगडधिंगाणा प्रकरणाची चौकशी होऊन त्या आठ पोलिसांवर निलंबनाची (08 Police Suspended) कारवाई होण्यामध्ये एका मंत्र्यांचा हस्तक्षेप झाल्याचे समोर आले आहे. रेस्टॉरंट मालक हा या मंत्र्यांच्या जवळचा मित्र असल्याने पोलिस चक्रे त्वरित फिरून ही कारवाई झाली आहे.

सांगोल्डा येथील रेस्टॉरंटमध्ये ओली पार्टी (गटारी) करण्यासाठी गेलेले आठही पोलिस कर्मचारी त्या दिवशी रात्री ड्युटीवर नव्हते. हे पोलिस असल्याने जनतेचे सेवक असताना त्यांची वर्तणूक ही पोलिस खात्याची प्रतिमा डागळणारी आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध ही कारवाई झाली आहे. लवकरच त्यांची पोलिस खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यासाठी आरोपपत्र दिले जाणार आहे. कारवाई करण्यासाठी कोणताही राजकीय हस्तक्षेप (No Political Interception) झाला नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Goa police
Panjim: कन्व्हेन्शन सेंटरसाठीच्या निविदांना मुदतवाढ

पोलिस स्थानक क्षेत्रातील पोलिस कर्मचाऱ्यांचे त्या क्षेत्रातील बार व रेस्टॉरंटस् तसेच इतर व्यावसायिकांच्या गैरकृत्यांकडे दुर्लक्ष करून लागेबांधे असतात. त्यामुळे पोलिसांचा त्यांच्यावर दरारा असतो. अनेकदा हे पोलिस कर्मचारी रेस्टॉरंटची बिले न देताच जातात मात्र कोणी त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यास पुढे येत नाही. किसमूर रेस्टॉंरटच्या मालकाचे एका मंत्र्यांशी असलेले घनिष्ठ संबंध यामुळे त्याला हे धाडस झाले. त्याने झालेला प्रकार मंत्र्यांच्या कानावर घालून मदत मागितली. मंत्र्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर पोलिस यंत्रणा गतिमान होऊन पोलिस महानिरीक्षकांनी त्या आठही जणांना निलंबित करण्याचे संबंधित विभागाच्या पोलिस अधीक्षकांना निर्देश दिले.

सरकारी नियमानुसार मद्य घेऊन ड्युटी करणे नियमबाह्य आहे. यासंदर्भात त्याच्याविरुद्ध शिस्तपालन न केल्याप्रकरणी कारवाई होऊ शकते. मात्र अशी प्रकरणे क्वचितच घडलेली आहेत. पोलिस खात्यातील रात्रपाळीला असलेले काही कर्मचारी हे बहुधा मर्यादेत राहून मद्य घेतात मात्र ते घेणेसुद्धा शिस्तीचे उल्लंघन करणारे आहे. पोलिसांनी ड्युटीवर असताना मद्य घेतले आहे की नाही हे पाहणे त्या पोलिस स्थानकाच्या प्रमुखाचे काम असते. पोलिस नियंत्रण कक्षाच्या गस्ती वाहनावर असलेले काही पोलिस कर्मचारी हे अनेकदा मद्यधुंद असतात .

Goa police
Goa Accident : कार नाल्यात कोसळून भीषण अपघात; चौघांना वाचवलं

पोलिस कर्मचाऱ्यांचे त्या क्षेत्रातील बार व रेस्टॉरंटस् तसेच इतर व्यावसायिकांच्या गैरकृत्यांकडे दुर्लक्ष करून लागेबांधे असतात. त्यामुळे पोलिसांचा त्यांच्यावर दरारा असतो. अनेकदा हे पोलिस कर्मचारी रेस्टॉरंटची बिले न देताच जातात. मात्र कोणी त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यास पुढे येत नाही.

किसमूर रेस्टॉरंटच्या मालकाचे एका मंत्र्यांशी असलेले घनिष्ठ संबंधामुळे त्याने हे धाडस केले. झालेला प्रकार मंत्र्यांच्या कानावर घातला. मंत्र्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर यंत्रणा गतिमान होऊन त्या आठही जणांना निलंबित करण्याचे संबंधित विभागाच्या पोलिस अधीक्षकांना निर्देश दिले.

Goa police
Goa Zuari Car Accident : झुआरी कार दुर्घटनेत चौघांचा मृत्यू

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com