भाजपचे धोरण सर्वसमावेश विकासाचे

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

भाजपा सरकार राज्यात आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा हा मंत्र घेऊन काम करीत आहे. भौतिक विकासाबरोबरच मानवाचा विकास होणे आवश्यक असल्याने राज्यातील दुर्बल घटकांचा विचार केवळ भाजपाच करीत आहे.

बार्देश :  भाजपा सरकार राज्यात आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा हा मंत्र घेऊन काम करीत आहे. भौतिक विकासाबरोबरच मानवाचा विकास होणे आवश्यक असल्याने राज्यातील दुर्बल घटकांचा विचार केवळ भाजपाच करीत आहे. घरांघरांत शौचालयाची व्यवस्था करण्याचे स्वप्न सुद्धा याआधीच्या सरकारने पाहिले नव्हते, मात्र ही कल्पना आणी संकल्पना फक्त भाजप सरकारद्वाराच राज्यात राबविण्यात आल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

नावेली-सासष्टीत आज जनतेचा श्वास कोंडून ठेवणारे  कचऱ्याचे डोंगर भाजपने नव्हे, तर या कॉग्रेस सरकारकडून गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून तयार करून ठेवलेले आहेत. भाजपकडून कचरा मंत्रालय स्थापन करून हा कचरा दिवसेंदिवस हटवण्याचा प्रयत्न करीत आहे. बिहारचे परिणाम बघितल्याने राज्यातही तसे वातावरण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

बेकारी तसेच अन्य समस्यांवर भाजप सरकार येत्या दीड वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन त्यांनी दिले. राज्यात कोळसा भाजपकडून नव्हे,  तर खुद्द काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात आणला गेला होता. यासाठी भाजपला दूषण न देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते समई प्रज्वलित करून तसेच फीत कापून पर्रा येथील नवीन पंचायत इमारतीचे उद्‍घाटन करण्यात आले. व्यासपीठावर  म्हापसाचे आमदार ज्योसुआ डिसौझा, प़चायतमंत्री माविन गुदिन्हो,  मंत्री मायकल लोबो, पर्रा पंचायत मंडळ व्यासपीठावर उपस्थित होते.

संबंधित बातम्या