प्रियोळातील राजकीय समीकरणे बदलणार

गोविंद गावडेंचा भाजप प्रवेश, तर संदीप निगळ्ये अपक्ष म्हणून मैदानात
Priol Constituency Politics
Priol Constituency PoliticsDainik Gomantak

फोंडा : मंत्री गोविंद गावडे यांनी अखेर भाजपमध्ये उडी घेतलीच. त्यामुळे प्रियोळ मतदारसंघातील समीकरणे निश्‍चितपणे बदलणार आहेत. गेल्या आठवड्यात म्हार्दोंळ येथे झालेल्या त्यांच्या सभेत हाच सूर जाणवला. त्यांनी भाजपशी कधीच गद्दारी करणार नसल्याचे स्पष्ट करून भाजप प्रवेशाची नांदीच आळवली होती. खरे तर त्याची चाहूल फोंड्याचे आमदार रवी नाईक यांच्या बेतोडा येथे झालेल्या भाजप प्रवेशावेळी आली होती. त्यावेळी गोविंद अगदी समोरच्याच रांगेत विराजमान झालेले दिसत होते. (Priol Constituency News Updates)

Priol Constituency Politics
मला रोखण्यासाठीच मगोची युती : मामलेदार

गोविंद गावडे हे रवी नाईक यांना राजकीय गुरु मानत असल्यामुळे त्यांच्या प्रवेशातूनच त्यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत मिळत होते. त्यामुळे ते म्हार्दोळ येथे आयोजित केलेल्या सभेत या प्रवेशाची घोषणा करणार असे वाटत होते. पण तसे न करता गावडे यांनी चेंडू कार्यकर्त्यांच्या रिंगणात फेकला होता. कार्यकर्ते जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य आहे, असे सांगून कार्यकर्त्यांना ‘हिरो’ करुन टाकले. आता प्रवेश घेतानासुध्दा त्यांनी हा कार्यकर्त्यांचा निर्णय असल्याचे नमूद केले. गेले आठ दिवस आपण कार्यकर्त्यांच्या संपर्कात होतो. त्यांनी भाजप प्रवेशास मान्यता दिल्यामुळेच आपण भाजपमध्ये शिरण्याचा निर्णय घेतला, हेही त्यांनी नमूद केले.

Priol Constituency Politics
मंत्री मायकल लोबोंचा पत्नीसह काँग्रेसमध्ये प्रवेश

प्रवेशाला भाजपा श्रेष्ठी अनुकूल असल्याचेही पूर्वीच स्पष्ट झाले होते. प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे (Sadanand Shet Tanavade) यांनी तर काही दिवसापूर्वी या प्रवेशाचे सूतोवाचही केले होते. गावडे भाजपमध्ये आल्यास त्यांनाच भाजपची उमेदवारी देणार, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यावेळी काही भाजप कार्यकर्त्यांनी या गोष्टीला विरोध दर्शविला होता. उद्योजक व प्रियोळ मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारीचे दावेदार असलेले संदीप निगळ्ये यांना घेऊन प्रियोळातील भाजपचे काही कार्यकर्ते पणजीच्या भाजपा कार्यालयात धडकलेही होते. तरीही तानावडे किंवा इतर पदाधिकाऱ्यावर काहीही परिणाम झाला नाही. भाजप पक्षश्रेष्ठी गोविंद गावडे यांच्या प्रवेशाला अनुकूल असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. मागच्या वेळी गावडे यांना भाजपचा पाठिंबा होता. मनोहर पर्रीकरांनी तर गोविंदाकरता माशेलात जाहीर सभा घेतली होती. पण यावेळी गोविंद गावडे अपक्ष म्हणून रिंगणात उतरताना त्यांना स्वतंत्र लढावे लागणार होते. याचा विचार करून शेवटी त्यांनी हा निर्णय घेतला असावा, असे वाटत असते, तरी या प्रवेशाचे संकेत काही दिवसापूर्वीच मिळाले होते.

Priol Constituency Politics
'काँग्रेसची टीएमसी सोबत युती नाही, 'या' चर्चा पूर्णपणे निराधार आणि असत्य'

जून महिन्यात गोव्यात आलेले भाजप नेते बी. एल. संतोष यांच्याकडे गोविंद यांनी तसा प्रस्तावही दिला होता. आता त्यांच्या भाजप (BJP) प्रवेशामुळे प्रियोळातील समिकरणे निश्‍चितपणे बदलणार आहेत. उद्योजक संदीप निगळ्ये हे आता अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार आहेत. म्हणजे नाटक तेच असले, तरी आगामी विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) भूमिकांची अदलाबदल होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com