'गोव्यातील राजकारणी आम्हाला टॅक्सी माफिया म्हणतात"

गोव्यातील टॅक्सी चालकांनी अरविंद केजरीवाल यांच्याकडे केली स्थानिक राजकीय नेत्यांची तक्रार
'गोव्यातील राजकारणी आम्हाला टॅक्सी माफिया म्हणतात"
Political leaders in Goa call us taxi mafia Taxi drivers lodge complaint with Arvind Kejriwal Dainik Gomantak

दाबोळी: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर गोव्यातही जारकीय हालचाली सूरू झाल्या आहेत. राष्ट्रीय नेत्यांचा गोवा दौरा सुरू झाला आहे. आणि या प्रचारादरम्यान गोल्यातील जनतेच्या समस्या जाणून त्यांना आश्वासन देण्याचा सपाटा सध्या राज्यात सुरू झाला आहे. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल कालपासून गोवा दौऱ्यावर आहेत. आणि त्यांनी आज गोव्यातील टॅक्सी चालकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.

Political leaders in Goa call us taxi mafia Taxi drivers lodge complaint with Arvind Kejriwal
गोवा टॅक्सी चालकांसाठी केजरीवालांची मोठी घोषणा

दरम्याने या सभेला उपस्थित असलेल्या काही टॅक्सी चालकांनी त्यांना आपल्या समस्या सांगितल्या. "राज्यातील राजकारणी आम्हाला टॅक्सी माफिया म्हणतात त्यामुळे आमचा अपमान होतो." अशी तक्रार स्थानिक टॅक्सी चालकांनी केजरीवालंकडे केली. त्यावर उत्तर देतांना,"गोव्यात आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाले तर आम्ही एक टॅक्सी महामंडळ स्थापन करू ज्यात 1-2 सरकारी अधिकारी आणि उर्वरीत टॅक्सी चालक असतील," असे अश्वासन गोव्यात आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी टॅक्सी चालकांनी दिले. त्याबरोबर आणखी चार नव्या घोषणाही त्यांच्यासाठी केल्या. आतापर्यंत आम आदमी पक्षाने गोमंतकीयांना अनेक आश्वासन दिली. आणि आपचे सरकार आल्यास हे सगळे आश्वासन पु्र्ण होतील असा विश्वासही आपने गोव्यात व्यक्त केला.

गोवा टॅक्सी चालकांसाठी केलेल्या घोषणा

गोव्यातील ऑटो/टॅक्सी चालकांसाठी महामंडळ स्थापन केले जाईल. टॅक्सी चालकाचा अपघात झाल्यास त्याचा पुर्ण वैद्यकीय खर्च शासन उचलणार त्याचबरोबर त्याला फेसलेस RTO सेवाही पुरविण्यात येतील. गोव्यातील डिजीटल टॅक्सी मीटरबाबत आम आदमी पक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देईल. अशा चार घोषणा आज केजरीवाल यांनी दाबोळी येथे केल्या.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com