लोकप्रतिनिधींनी सरकारला सहकार्य करावे

Babu Kavlekar
Babu Kavlekar

सासष्टी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सासष्टी तालुक्यातील नगरपालिका तसेच पंचायतींना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी मडगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस मत्सद्योगमंत्री फिलिप नेरी रॉड्रिग्ज, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय, दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक पंकज कुमार सिंग, सासष्टी तालुक्यातील ३३ पंचायतींचे सरपंच, कुंकळ्ळी आणि मडगाव पालिकेचे नगराध्यक्ष उपस्थित होते.
गोव्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य व पोलिस खाते प्रयत्न करीत असून यात लोकप्रतिनिधींनी सहभागी होणे आवश्यक आहे. नगरपालिका आणि पंचायत क्षेत्रात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी कशाप्रकारे काळजी घ्यावी यासंबंधी चर्चा करण्यात आली. या बैठकीत उपस्थित असलेल्या अनेक सरपंचांनी सरकारला आपल्या सूचना दिल्या असून या सूचना मुख्यमंत्र्यांकडे पोहचविण्यात येतील, असे कवळेकर यांनी सांगितले. पंचायत तसेच नगरपालिका क्षेत्रातील कोरोनाची स्थिती जाणून घेण्यासाठी सरपंच तसेच नगराध्यक्षानी व्हॉट्सॲपवर ग्रुप तयार करावा आणि यात पंच सदस्य, नगरसेवक, आमदार, पोलिस निरीक्षक, आरोग्य अधिकारी, मामलेदार यांना सहभागी करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
होम क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या नागरिकांची माहिती पंचायत तसेच नगरपालिकेला देण्यात येत नसल्यामुळे या नागरिकांवर नजर ठेवण्यास पंचायत तसेच नगरपालिकेला शक्य होत नाही. त्यामुळे होम क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या नागरिकांची माहिती देण्यासाठी आरोग्य विभागाला सूचित करण्यात येणार आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी एकत्र राहणे महत्वाचे असून लोकप्रतिनिधींनी राजकरण न करता, सरकारला पाठिंबा देणे आवश्यक आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी सतर्कता बाळगावी व प्रत्येक नागरिकाने सामाजिक अंतराचे पालन करावे, असेही त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या वाढत्या संख्येवर रोख लावण्यासाठी तसेच कोरोनासंबंधी समस्या जाणून घेण्यासाठी आरोग्य विभाग, पोलिस, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत यापूर्वी बैठक घेण्यात आली आहे. आज सासष्टीतील पंचायतीचे सरपंच आणि नगराध्यक्षांबरोबर बैठक घेण्यात आली. आता सासष्टी तालुक्यातील आठही मतदारसंघातील आमदारांसोबत बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे, असे कवळेकर यांनी सांगितले.

संपादन - यशवंत पाटील

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com