'या' दोन्ही पक्षात होणार युती सरदेसाई

गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसमध्ये युतीचे संकेत; सरदेसाई
Political News : Signs of alliance between Goa Forward and Congress
Political News : Signs of alliance between Goa Forward and CongressDainik Gomantak

मडगाव Political News : कार्याध्यक्ष किरण कांदोळकर यांनी पक्ष सोडल्यावर बसलेल्या धक्क्यातून गोवा फॉरवर्ड सावरला असून काँग्रेस पक्षाबरोबर युती करण्याच्या दिशेने त्यांनी पाऊले उचलली आहेत. गोवा फॉरवर्ड (Goa Forward) आणि काँग्रेस (Congress) या दोन्ही पक्षात युती होणार असल्याचे संकेत फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आज दिले.

Political News : Signs of alliance between Goa Forward and Congress
मयेत सरकार विरोधात घोषणा..!

कांदोळकर यांच्या पक्ष सोडून जाण्यानंतर काल रात्री गोवा फॉरवर्ड नेत्यांची मांद्रे येथे बैठक झाली. यावेळी बोलताना सरदेसाई यांनी '' काँग्रेस नेते दिनेश गुंडू राव यांनी युती बद्दल जे संकेत दिले आहेत त्याचे आम्ही स्वागत करतो. काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड मिळून आम्ही भाजपला गोव्यात घरी पाठवू, असे उद्‍गार काढले होते. काल त्यांनी मांद्रे येथे बूथ कार्यकर्त्यांची बैठक घेतली तर आज मये येथे बैठक झाली.

कांदोळकर यांचे सोडून जाणे, हे आमच्यासाठी जरी धक्कादायक असले तरी त्यामुळे आम्ही हादरून गेलेलो नाहीत. गोव्यातून जनविरोधी भाजप सरकार हाकलून लावणे हे आमचे एकमेव उद्दिष्ट असून त्यापासून आम्ही धळलेलो नाहीत. गोय, गोयकार आणि गोयकारपण सांभाळून ठेण्यासाठी आमचा लढा चालूच राहील, असे त्यांनी सांगितले. आमची काँग्रेस नेत्यांशी बोलणी चालू आहेत. लवकरच त्याचा सकारात्मक निकाल दिसून येईल असा विश्वास सरदेसाई यांनी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com