कोळसा विरोधी आंदोलनात राजकीय पक्ष सक्रिय

Political parties active in anti coal movement
Political parties active in anti coal movement

मडगाव : दक्षिण गोव्यात कोळसा व रेलमार्ग दुपदरीकरण विरोधी आंदोलन जोर धरू लागले असून जनभावना ओळखून राजकीय पक्ष व नेत्यांचा या आंदोलनात सहभाग वाढू लागला आहे. ‘गोंयान कोळसो नाका’ संघटनेने सुरू केलेल्या या आंदोलनात वेगवेळ्या संस्था, संघटनांही सहभागी होत असून या बिगरसरकारी संस्थांसोबत काँग्रेस व गोवा फॉरवर्ड हे दोन राजकीय पक्ष सध्या या आंदोलनात आघाडीवर आहेत.


या आदोलनाचा सासष्टी व मुरगाव तालुक्यातील राजकारणावर प्रभाव पडणार आहे. आगामी निवडणुकीत सासष्टी व मुरगाव तालुक्यातील मतदारसंघांमध्ये कोळसा व रेलमार्ग दुपदरीकरण हे प्रचाराचे मुख्य मुद्दे असतील अशी स्पष्ट चिन्हे आहेत. 


रेलमार्ग जाणाऱ्या सासष्टीतील कुंकळ्ळी, वेळ्ळी, नावेली, मडगाव, फातोर्डा, नुवे व मुरगावमधील कुठ्ठाळी, दाबोळी, वास्को व मुरगाव या मतदारसंघांसह कुडतरी, बाणावली या मतदारसंघांतही कोळसा व रेलमार्ग दुपदरीकरण मुद्दे प्रभावी ठरणार आहेत. याचा राजकीय लाभ मिळवण्यासाठी भाजपविरोधी पक्षांमध्ये चढाओढही लागणार आहे. 


चांदर येथे रविवारी रात्री आंदोलनात बिगर सरकारी संस्थांच्या कार्यकर्त्यांसोबत काँग्रेस व गोवा फॉरवर्डच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शक्तीप्रदर्शन केले. काँग्रेसच्ये ज्येष्ठ नेते व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यासह माजी वीजमंत्री आलेक्स सिक्वेरा,  काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, सरचिटणीस अमरनाथ पणजीकर, जनार्दन भंडारी, युवा काँग्रेसचे अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, जनार्दन भंडारी, युवा नेते व कुंकळ्ळीचे संभाव्य उमेदवार युरी आलेमाव, दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ज्यो डायस व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 


गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्यासह पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत, अकबर मुल्ला, सरचिटणीस प्रशांत नाईक व मोहनदास लोलयेकर, नगरसेवक जुझे गोम्स, युवा नेते दीपक कळंगुटकर, रामनाथ बाळे व कार्यकर्त उपस्थित होते. 


सरदेसाई यांनी कोकणी प्रजेचो आवाजने पूर्वी केलेल्या आंदोलनाचा उल्लेख करून कोळसा विरोधी आंदोलन पेटणार असल्याचे संकेत दिले आहेत. 
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, दक्षिण गोव्याचे खादसार फ्रान्सिस सार्दीन, कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स आदी नेत्यांनी कोळसा व रेलमार्ग दुपदरीकरणाच्या विरोधात आधीपासूनच भूमिका घेतली आहे. या नेत्यांनी या विषयावरून भाजप सरकारवर सतत टीकेची झोड उठवली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com