प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यपदासाठी अनेक अर्ज

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्ष आणि सचिव पदासाठी अनेकांनी अर्ज केले आहेत. यात सध्याचे अध्यक्ष गणेश शेटगावकर आणि सचिव शमिला मोंतेरो यांचाही समावेश आहे.

पणजी :  गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्ष आणि सचिव पदासाठी अनेकांनी अर्ज केले आहेत. यात सध्याचे अध्यक्ष गणेश शेटगावकर आणि सचिव शमिला मोंतेरो यांचाही समावेश आहे. मोंतेरो या गोवा सरकारच्या सेवेतील वरिष्ठ अधिकारी असून त्या मंडळावर प्रतिनियुक्तीवर आहेत. अध्यक्षपदासाठी चंद्रशेखर रिवणकर, डॉ. के. जी. गुप्ता, राजस साळकर,  महेश पाटील,  डॉ. मनोज बोरकर, डॉ. उल्हास सावईकर, डॉ. दीपक गायतोंडे यांचे अर्ज आले आहेत. सचिवपदासाठी मारीया फर्नांडिस, डेरिक फर्नांडिस, डॉ. गीता नागवेकर यांनी अर्ज केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानुसार या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांचीच निवड करता येणार आहे. त्यासाठीची मार्गदर्शक सूचना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेली आहे.

संबंधित बातम्या