Ponda Development : विकास प्रस्तावांना केवळ १५ दिवसांत मंजुरी

माविन गुदिन्हो : उसगाव येथे नव्या पंचायत सभागृहाचे लोकार्पण
Mauvin Godinho
Mauvin GodinhoGomantak Digital Team

फोंडा : पूर्वी विकासकामाला मंजुरीसाठी अनेक दिवस लागत होते. त्यामुळे विकासकामे वेळेवर होत नव्हती. याप्रकरणी सरपंचांच्या तक्रारी येत होत्या, पण आत्ता पंचायतीच्या विकासकामांच्या प्रस्तावाला केवळ १५ दिवसांत मंजुरी मिळते. त्यामुळे कामे जलदगतीने होऊ लागली आहेत,असे प्रतिपादन पंचायतमंत्री मविन गुदिन्हो यांनी केले. वाढत्या विकासकामांमुळे निधी कमी पडू लागला आहे, असेही ते म्हणाले.

राज्य पायाभूत साधन सुविधा विकास महामंडळातर्फे उसगाव येथे बांधलेल्या एकात्मिक सामाजिक सभागृहासह बहुउद्देशीय पंचायत इमारत प्रकल्पाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सायंकाळी हा समारंभ बाराजण-उसगाव येथील नव्या पंचायत सभागृहात झाला.आज राज्यातील ३२ व्या नव्या पंचायत घराचे उद्‍घाटन करताना आपल्याला पुष्कळ आनंद होत आहे, असेही गुदिन्हो यांनी म्हणाले.

Mauvin Godinho
Phonda Police: फोंड्यात 1 कोटी 61 लाखांची दंड वसुली!

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे होते. व्यासपीठावर उसगाव जि. पं. सदस्य उमाकांत गावडे, उसगाव-गांजेचे सरपंच नरेंद्र गावकर, उपसरपंच संगीता डोईफोडे, पंचायत संचालनालयाचे उपसंचालक प्रसिद्ध नाईक, पंचायत सदस्य प्रकाश गावडे, राजेंद्र नाईक, विनोद गावडे, विल्यम मस्कारेन्हास, गोविंद परब फात्रेकर, रेश्मा मटकर, सचिव प्रसाद शेट, प्रसाद नाईक, जीएसआयडीसीचे अधिकारी दिलीप जोशी, सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे, खांडेपारचे सरपंच नावेद तहसिलदार आदी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. सखी सहेली महिला मंडळाच्या सदस्यांनी स्वागतगीत सादर केले. सरपंच नरेंद्र गावकर यांनी स्वागत केले. अजय बागकर यांनी सूत्रसंचालन केले. गोविंद फात्रेकर यांनी आभार मानले.

Mauvin Godinho
Ponda : फोंडा मुक्तिधाम नूतनीकरण कामाला प्रारंभ

मंत्री राणेंमुळे मैदानाची पूर्तता !

उसगांव पंचायत क्षेत्रात मंत्री विश्वजीत राणे यांनी १५ हजार चौमी. जमीन दिलेली आहे. या जागेत सुसज्ज असे मैदान उभारण्यात येणार आहे. या भागात मैदानाची खरोखरच गरज होती. ती मागणी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मंत्री विश्वजीत राणे यांनी आम्हाला सुसज्ज अशी इमारत बांधून दिलेली आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो,असे सरपंच नरेंद्र गांवकर यांनी सांगितले.

आपल्या मतदारसंघातील गरीब व सामान्य लोकांच्या विकासाचा आपल्याला ध्यास आहे. गोरगरिबांचे जीवनमान उंचावण्याचा आपला मानस आहे. आपल्या प्रयत्नांतून उसगाव पंचायत भागाचा सर्वांगीण विकास साधणार आहे.

- विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री

Mauvin Godinho
Ponda News: ‘मुक्तिधाम’चा कायापालट होणार

खुल्यावर कचरा टाकणाऱ्यांना दंड करा !

प्लास्टिक अन् कचरामुक्त गोवा व्हावा,यासाठी सरकार सक्रिय आहे.विविध योजनांद्वारे सर्व पंचायतींना कचरामुक्तीसाठी निधी तसेच साधन सुविधा पुरवल्या जात आहेत. कचरा मुक्तीसाठी जनतेचेही सहकार्य अत्यंत महत्वाचे आहे. सध्या काही लोक जागा मिळेल त्या ठिकाणी कचरा टाकत आहेत, तेव्हा कचरा टाकणाऱ्यांचे फोटो काढून त्यांच्यावर दंडाची कारवाई करा, असे गुदिन्हो यांनी सांगितले. रस्त्यांचा दर्जा सुधारला आहे. त्यामुळे वाहने वेगाने हाकली जात असून, अपघातही वाढले आहेत. त्यामुळे नियम पाळा, असे आवाहन त्यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com