Ponda: निवडणूक कार्यालयात गोविंद गावडेंचा अर्ज दाखल

फोंडा तालुक्यातून पहिलीच उमेदवारी
Ponda Govind Gawade
Ponda Govind GawadeDainik Gomantak

Ponda: फोंडा उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकाऱ्याकडे गोविंद गावडे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. फोंडा तालुक्यातून ही पहिलीच उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्यासमवेत प्रियोळ मतदारसंघातील (Priol Constituency) काही सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य तसेच जिल्हा पंचायत सदस्य व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Ponda Govind Gawade
Goa Election 2022: आलेक्स रेजिनाल्ड यांना राष्ट्रवादीच्या पायघड्या

निष्ठावंत कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाच्या सहाय्याने यावेळेला आपल्याला विक्रमी मतदान होईल, अशी अपेक्षा व्यक्त करताना भाजप (BJP) सरकारच्या सहकार्यानेच आपण प्रियोळ मतदारसंघात विकासकामे करू शकलो, आताही मतदारांचा कौल आपल्यालाच मिळेल, आणि भाजपच सत्तेवर येईल, असा विश्‍वास प्रियोळ मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार गोविंद गावडे (Govind Gawade) यांनी व्यक्त केला.

गोविंद गावडे म्हणाले की, प्रियोळ मतदारसंघाचा विकास हा कार्यकर्ते आणि मतदारांच्या सहभागाने झाला आहे. प्रियोळ मतदारसंघाला चांगले ते देण्याचा आपला प्रयत्न राहिला असून यापुढेही प्रियोळ मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कार्यरत राहीन अशी ग्वाही दिली.

Ponda Govind Gawade
मुख्यमंत्र्यांचा साखळी मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का

सेवा करण्याची संधी

स्व. मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियोळच नव्हे, तर मंत्री या नात्याने सबंध गोव्याची सेवा करण्याची संधी मिळाली. मनोहर पर्रीकर यांच्यानंतर डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली विकास प्रकल्प पुढे नेण्यात मदतच झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तसेच इतर पदाधिकाऱ्यांचे सहकार्य वेळोवेळी लाभले, त्यामुळेच आपण भाजपमध्ये प्रवेश केला आणि यावेळेला मागच्यापेक्षा सर्वाधिक मते आपल्याला या मतदारसंघात मिळतील, असा विश्‍वास गोविंद गावडे यांनी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com