फोंडा पालिकेच्या नगराध्यक्षपदी विश्वनाथ दळवी यांची निवड

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

फोंडा पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी विश्‍वनाथ दळवी यांचा गुरुवारी दुपारपर्यंत एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड निश्‍चित झाली होती. त्याप्रमाणे शुक्रवारी सकाळी औपचारिक रित्या फोंडा पालिकेच्या नूतन नगराध्यक्षपदी म्हणून विश्‍वनाथ दळवी यांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली.

फोंडा: फोंडा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदावर असलेले विश्‍वनाथ ऊर्फ अपूर्व दळवी यांची अखेर नगराध्यक्षपदी म्हणून शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. फोंडा पालिकेच्या कार्यालयात आज शुक्रवारी सकाळी नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीची रीतसर प्रक्रिया पार पडली. 

फोंडा पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी विश्‍वनाथ दळवी यांचा गुरुवारी दुपारपर्यंत एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड निश्‍चित झाली होती. त्याप्रमाणे शुक्रवारी सकाळी औपचारिक रित्या फोंडा पालिकेच्या नूतन नगराध्यक्षपदी म्हणून विश्‍वनाथ दळवी यांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली.

नगराध्यक्ष व्यंकटेश ऊर्फ दादा नाईक यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. नगराध्यक्षपदासाठी नगरसेवक शांताराम कोलवेकर, विश्‍वनाथ दळवी व भाजपात नुकतेच प्रवेश केलेले रितेश नाईक यांचे नाव होते. नगराध्यक्ष पदासाठी विरोधी मगो पक्षातर्फे अंतिमक्षणी एकही अर्ज भरला नसल्याने अपेक्षेप्रमाणे विश्‍वनाथ दळवी यांचा मार्ग सुकर झाला व नगराध्यक्षपदी निवड झाली.

यावेळी नगराध्यक्ष विश्‍वनाथ दळवी यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की राज्यातील भाजपा सरकारातील मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या माध्यमातून कुठल्याही प्रभागावर अन्याय न करता समान न्याय देण्याचे आपले प्रयत्न असतील. फोंडा शहराच्या विकासकामांना चालना देण्याबरोबर चांगल्या सुविधा देण्याचे आपले प्रयत्न राहील. विशेषतः फोंडा पालिकेच्या मार्केट प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्णत्वाकडे आणण्याचे प्रयत्न राहील. कचरा प्रकल्पाच्या कामाला प्रामुख्याने प्राधान्य देण्याचे प्रयत्न राहील, असे दळवी म्हणाले.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या