Ponda नगरपालिकेचे पंधरा प्रभाग भाजपच्या हातात!

फोंडा नगरपालिका निवडणूक: इच्‍छुक उमेदवार तयारीला लागले.
Ponda Municipality
Ponda MunicipalityDainik Gomantak

पुढील वर्षी 22 मे रोजी फोंडा पालिका मंडळाची मुदत संपत आहे. त्यामुळे इच्छुकांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. सध्या फोंडा नगरपालिकेचे पंधरा प्रभाग असून ती भाजपच्या हातात आहे. भाजपचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रितेश हे सध्या नगराध्यक्षपदी असून भाजपच्याच अर्चना डांगी या उपनगराध्यक्षपदी आहेत. गेल्या साडेचार वर्षांत या पालिकेतील समीकरणे बदलत गेली असून सुरुवातीला मगोपच्या हातात असलेली ही नगरपालिका आता भाजपकडे आहे.

2018 साली झालेल्या फोंडा पालिका निवडणुकीत मगोपप्रणित रायझिंग फोंडा गटाचे सात, भाजपचे पाच, तर काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आले होते. पण नंतर काँग्रेसच्या तिन्ही नगरसेवकांनी भाजप पक्षात उडी घेतल्यामुळे काँग्रेसची पाटी कोरी झाली होती. त्याचप्रमाणे मगोपच्या दोन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे मगोपच्या नगरसेवकांची संख्याही पाचवर घसरली होती.

Ponda Municipality
शंभरहून अधिक वर्षे जुना क्रॉस हटविल्याने शिवोलीत तणाव

निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये असलेले पूर्वाश्रमीचे काँग्रेस नगरसेवक विलियम आगियार यांनी परत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे सध्या काँग्रेसचे खाते परत एकदा उघडले आहे. संगीत खुर्चीच्या खेळाकरिताही ही नगरपालिका गाजते आहे. गेल्या सव्वाचार वर्षात या नगरपालिकेत एकूण सहा नगराध्यक्षांनी खुर्ची भूषविली आहे.

त्यामुळे विकासाला बऱ्याच अंशी खिळ पडलेली दिसत आहे. आता कार्यकालाच्या शेवटच्या टप्प्यात विकासाला गती आली असून अनेक प्रलंबित कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर दिसताहेत.फोंडा बाजारातील शेड हे अशापैकीच एक काम. ही शेड ‘बहुउद्देशीय’ असल्यामुळे तीची बाजारातील व्यापाऱ्यांना तसेच ग्राहकांना त्याचबरोबर बुधवार पेठ गणेशोत्सव मंडळाला सुध्दा अत्यंत गरज आहे. आता ही शेड पूर्ण होण्याच्या मार्गावर असून पुढील वर्षाचा बुधवार पेठ गणेशोत्सव मंडळाचा गणपती याच शेडीत बसणार अशी चिन्हे दिसताहेत.

Ponda Municipality
Goa Mining| खाण अवलंबितांच्या आशेला पालवी; खरी कुजबूज

प्रभाग रचनाही महत्त्वाची: आता प्रभाग वाढल्यास प्रभागांची रचनाही बदलू शकते. यामुळे उमेदवारांचे भवितव्य अनेक जर- तरच्या समीकरणांवर अवलंबून असल्याचे दिसते आहे. असे असले तरी आपल्याला हवा तसा प्रभाग होणार असे गृहीत धरून उमेदवारांनी पूर्वतयारी सुरू केली असून त्यांचे आराखडे किती बरोबर ठरतात आणि ते मतदारांशी जवळीक साधण्यात किती यशस्वी ठरतात याचे उत्तर येणारा काळच देऊ शकेल एवढे खरे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com