Ponda Municipality Election 2023: प्रभाग 4 खुला झाल्याने चुरस वाढणार

चौरंगी लढतीचे संकेत : परिसरातील खुल्या जागा, वाहतूक कोंडीसारखे कळीचे मुद्दे आले ऐरणीवर
Ward 4
Ward 4Gomantak Digital Team

Ponda Municipality Election 2023 : फोंडा-मडगाव हा राज्यातील एक प्रमुख रस्ता. तिस्क फोंडाहून निघालेलो हा रस्ता ढवळी बोरी मार्गे नंतर मडगाव ला पोहोचतो. याच रस्त्यावर फोंडा पालिकेचा प्रभाग क्रमांक चार वसलेला आहे.

फोंड्याच्या एकमेव उपजिल्हा इस्पितळापासून सुरू झालेली या प्रभागाची हद्द ढवळीच्या सीमेपर्यंत संपते.

सरस्वतीचे देऊळ, गजबजलेला तिस्काचा चौक, फोंड्याचे न्यायालय आदींचाही या प्रभागात समावेश आहे. यशवंत नगर हे सध्या फोंड्यातील विकसित झालेले एक महत्त्वाचे नगर हेही याच प्रभागात येते.मात्र, विकसित वाटणाऱ्या या प्रभागातील खुल्या जागा विनावापर असून बालोद्यानही या प्रभागात नाही.

विद्यमान नगरसेविका चंद्रकला नाईक यांच्याबरोबरच मागच्या वेळी आरक्षणामुळे प्रभाग पाच मधून निवडणूक लढवावे लागलेले माजी नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक हेही यावेळी प्रभाग क्रमांक चार मधून निवडणूक लढविणार आहेत.

Ward 4
Goa RajBhavan Bonsai: देशातील सर्वात मोठे बॉन्साय उद्यान गोव्याच्या राजभवनात

या दोघांशिवाय भाजप पॅनलचे संदीप घाडी आमोणकर हे रिंगणात उतरणार असून म. गो. प्रणित रायझिंग फोंडाचे उमेदवार स्पर्धेत असणार आहेत. यामुळे चौरंगी लढतीचे संकेत आतापासूनच दिसू लागले असून चुरस वाढू लागली आहे.

या नगरात बंगले आणि सदनिका याचे जाळे पसरले असून त्यामुळे प्रभाग क्रमांक चार मधल्या उमेदवाराचा भर प्रामुख्याने या नगरावर असतो.

Ward 4
Margaon Municipality : मडगावात बेकायदेशीर घरांनाही लागणार कर

एकूण मतदार संख्येतील प्रमुख वाटा हे नगर उचलते. हा प्रभाग मुख्य रस्त्यावर असल्यामुळे येथे आस्थापनाचीही गर्दी दिसून येते.

पण मतदानाचा विचार केल्यास बहुतेक मतदार हे यशवंत नगर, आयडी इस्पितळ, न्यायालयाशेजारचा परिसर इथे दडलेले दिसून येतात.

Ward 4
Lucky Ali: 'ब्राम्हण या शब्दाची निर्मिती इब्राहिम पासून...' विवादित पोस्टवर मागितली माफी

दाग -फोंडा हा कवळे / आगापूर या रस्त्यावर असलेल्या परिसरातील काही भागही प्रभाग क्रमांक 4 मध्ये येतो, येथेही आता नव्या वसाहती वसू लागल्या आहेत.

अशा आडव्या उभ्या पसरलेल्या प्रभागाचे प्रतिनिधित्व सध्या चंद्रकला नाईक या करताहेत. मागच्या वेळी हा प्रभाग महिलांकरता आरक्षित होता.

तत्पूर्वी सलग दोनदा या प्रभागाचे प्रतिनिधित्व माजी नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक यांनी केले होते. पण हा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे त्यांना प्रभाग 5 मधून निवडणूक लढवावी लागली होती. चंद्रकला नाईक यांनी ‘मगो’ प्रणित रायझिंग फोंडाच्या सीता काकोडकर यांच्यावर मात केली होती.

Ward 4
Revolutionary Goans: ‘आरजी’ची प्रतिमा मलीन करण्याचा डाव : मनोज परब

उद्यानाच्या कामाला प्रारंभ !

गेल्या पाच वर्षात आपण या प्रभागात अनेकविकास कामे राबवली असल्याची माहिती या प्रभागाच्या नगरसेविका चंद्रकला नाईक यांनी दिली.

उपजिल्हा हॉस्पिटलाकडे गटारी बांधणे, तेथील रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण, वीज खांब बसवणे आदी कामे केली आहेत. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे उद्यानाच्या बांधकामाची सुरुवात.

या प्रभागात उद्यान नसल्यामुळे त्याने तिथे असलेल्या क्लबचे रूपांतर उद्यानात करायचे ठरवले. आता कामाला सुरुवात झाली असून लवकरात ते पूर्णत्वास जाणार आहे.

आपल्या प्रभागापासूनच शहरातील मल निस्सारण प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे,असेही नाईक यांनी सांगितले.

Ward 4
Luizinho Faleiro: फालेरोंना राजीनामा देण्‍यास लावले, राजकीय विश्लेषकांनी वर्तवला अंदाज

प्रभागातील वाहतूक कोंडी नित्याचीच समस्या !

या प्रभागाचा फेरफटका मारल्यास त्यातील सुबकपणा नजरेत भरतो. काही ठिकाणी ‘खुल्या जागा’ असल्या तरी इतर ठिकाणी आस्थापनाचे व वसाहतींचे जाळे पसरलेले दिसून येते.

मुख्य म्हणजे या प्रभागातील बहुतेक भाग हा मुख्य रस्त्यावर असल्यामुळे तिथे नेहमीच वर्दळ दिसून येते.

वाहतूक कोंडी वा ठप्प होणे हा या प्रभागातील नित्याचाच प्रकार. या प्रभागात सध्या 1040 मतदार आहेत. एकंदऱीत झपाट्याने विकसित होत झालेल्या या प्रभागाच्या गरजाही भविष्यात विस्तारित होत जाणार हे मात्र नक्की.

Ward 4
Relationship Tips: ब्रेकअपनंतर तुमचा एक्स पार्टनर 'हे' काम करू शकतो

प्रभाग क्र.४ मध्ये आपण लोकांना अपेक्षित असलेला विकास साधलेला आहे. गेल्या पाच वर्षात विविध विकासकामे आपण मार्गी लावलेली आहेत.

आता जरी हा प्रभाग क्रमांक चार खुला झाला असला तरी आपण निवडणूक लढवणार आहे. आपल्या कामाच्या जोरावर आपण ही निवडणूक लढवणार आहे.

चंद्रकला नाईक, नगरसेविक

रवींच्याच नेतृत्त्वात पालिका निवडणूक

खासदार विनय तेंडुलकर : लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात

फोंडा नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या असुन 5 मे रोजी मतदान होणार आहे. भारतीय जनता पक्ष स्वबळावर ही निवडणूक लढवणार असून राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर यांच्यावर पक्षाने फोंडा नगरपालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे.

Ward 4
Goa RajBhavan Bonsai: देशातील सर्वात मोठे बॉन्साय उद्यान गोव्याच्या राजभवनात

फोंडा नगरपालिकेची निवडणुक कृषि मंत्री रवी नाईक यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली लढवली जाईल, असे तेंडुलकर यांनी मडगाव दक्षिण गोवा भाजप कार्यालयात प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

फोंडा नगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागात उमेदवार निश्‍चितीची प्रक्रिया सुरू असून अर्ज भरून झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, तरीही यावेळी फोंडा पालिकेत भाजप पूर्ण बहुमताने निवडून येईल, असा विश्र्वास खासदार विनय तेंडुलकर यांनी व्यक्त केला.

Ward 4
G-20 Summit Goa 2023: आरोग्य योजनांची यशस्वी अंमलबजावणी

केंद्रीय समिती ठरवेल तो उमेदवार !

16 एप्रिल रोजी गृहमंत्री अमित शहांची सभा आहे. ते गोव्यात येऊन पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करणार आहेत. या भेटीनंतर निवडणूक तयारीला वेग येईल.

दक्षिण गोव्यात इच्छुकांची चाचपणी सुरू असुन निवडणुका जाहीर होताच पक्षाची केंद्रीय समिती उमेदवार ठरवेल. त्यासाठी कार्यकर्ते खंबीरपणे उभे राहतील,असेही तेंडुलकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com