Ponda Municipality: नगरसेवकांचीच दांडी; फोंडा नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्याविरोधातील अविश्वास ठराव बारगळला

रितेश नाईक यांच्या विरुद्ध 8 नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केला होता.
Ponda Municipality
Ponda MunicipalityDainik Gomantak

फोंडा: फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्याविरुद्ध दाखल झालेला अविश्वास ठराव आज बारगळला आहे. रितेश नाईक यांच्या विरुद्ध 8 नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. या बैठकीत नगराध्यक्षांसह अन्य 14 नगरसेवकांची अनुपस्थिती होती. यासंबंधीची बैठक पालिका संचालनालयाने सकाळी अकरा वाजता बोलावली होती.

(Ponda Municipality)

Ponda Municipality
Congress : गोव्यात काँग्रेसची नवी समिती पक्षाला ऊर्जा देऊ शकते?

फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्याविरुद्ध आठ नगरसेवकांनी आणलेल्या अविश्‍वास ठरावावर आज चर्चा होणार होती. पंधरापैकी आठ नगरसेवकांनी हा अविश्‍वास ठराव आणला असला तरी त्यातील एक नगरसेवक गळाला असल्याने आता केवळ सातच संख्याबळ अविश्‍वास ठराव आणलेल्यांकडे उरले आहे. त्यामुळे हा ठराव बारगळल्यात जमा आहे.

फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्याविरुद्ध केवळ सहा महिन्यातच हा अविश्‍वास ठराव आणल्यानंतर आठपैकी एकाला भाजपने आपल्या गोटात वळवण्यात यश मिळवल्यामुळे आता ठराव आणलेले सातजण बैठकीला अनुपस्थितीत राहिले

Ponda Municipality
Goa Beach: समुद्रकिनाऱ्यांवर सर्रास बेकायदेशीर बांधकामांमुळे; किनारी भागात माजलीय अराजकता!

दरम्यान, फोंडा पालिकेतील संगीत खुर्चीच्या राजकारणाला रितेश नाईक यांच्याविरुद्धच्या अविश्‍वास ठरावाने चाप बसण्याची शक्यता असून यावेळेला विरोधकांना संधीच नाही, असे भाजप समर्थक नगरसेवकांनी या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले. त्यातच पालिका मंडळाचा कार्यकाळ केवळ चारच महिन्यांचा शिल्लक आहे, त्यामुळे अविश्‍वास ठराव आणला आणि संमत झाला तरी पुढील नगराध्यक्ष कितपत काम करेल, हाही प्रश्‍न आहे.

मगो समर्थक तोंडघशी!

अविश्‍वास ठराव आणलेल्यांत मगो समर्थक नगरसेवक आहेत. मात्र, मगो पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीने हा ठराव आणण्यामागे आमचा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट केल्याने मगोचे सहाही समर्थक तोंडघशी पडले आहेत. त्यामुळे हा अविश्‍वास ठराव म्हणजे नुसती औपचारिकता असेल, असे भाजप समर्थक नगरसेवकांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com