
Ponda Paduka Pujan: अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणीजधाम उपपीठ गोवा सेवा मंडळाच्या वतीने नरेंद्राचार्य महाराज सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने गोवा येथील युनायटेड स्टेट्स क्लब मैदानावर पूजन व दर्शन सोहळ्याला हजारो भाविकांनी श्रींच्या पादुकांचे दर्शन घेतले.
गोवा राज्यातील फोंडा तालुक्यातील म्हार्दोळ येथे नरेंद्राचार्य महाराज सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी नऊ वाजता मंगेशी येथील देव मंगेश मंदिराकडून महाराजांच्या सिध्द पादुकांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मारुतीरायांचा देखावा सादर करण्यात आले.
तसेच भजनी मंडळ, कलशधारी महिला, निशाणधारी पुरुष व महिला यांच्या सह प्रत्येक तालुक्यातून विविध पथक हजारोंच्या संख्येने सहभागी झालेले भाविक, भक्त, हितचिंतक मिरवणुकीत सामील झाले होते.
ही मिरवणूक कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळी अकरा वाजता दाखल झाली. यावेळी उपस्थित भाविकांनी नरेंद्राचार्य महाराजांच्या सिध्द पादुकांचे भव्य स्वागत केले.
या कार्यक्रमात 15 गरीब व गरजू महिलांना शिलाई मशीनचे मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या सोहळ्यात नरेंद्राचार्य महाराजांच्या सिध्द पादुकांचे विधिवत गुरुपूजन करण्यात आले.
त्यानंतर प्रवचनकार साधनाताई शिंदे महाराज यांनी सुश्राव्य प्रबोधन केले. संध्याकाळी नरेंद्रचार्य महाराजांनी नवीन भाविकांना दीक्षा का घ्यावी, याचे महत्त्व पटवून देणारे सुश्राव्य असे प्रवचन केल्यानंतर भाविकांना उपासक दीक्षा दिली.
संध्याकाळी आरती करून श्रींच्या चरणावर पुष्पांजली अर्पण करून श्रींचे कृपार्शिवाद घेतले व गाऱ्हाणे घालून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.