फोंडा वाहतूक पोलिसांनी सरत्या वर्षात जमवले 71 लाख

गोवा पोलिसांची धडक कारवाई, गतवर्षात 57 हजार वाहनचालकांना केला दंड
Ponda traffic police

Ponda traffic police

Dainik Gomantak

फोंडा: फोंडा वाहतूक पोलिसांनी (Ponda traffic police) सरत्या वर्षात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 56988 वाहनचालकांविरुध्द दंडात्मक कारवाई करून 71लाख रुपयांपेक्षा जास्त महसूल सरकारी तिजोरीत जमा केला आहे. सन 2020 साली 54625 वाहनचालकांविरुध्द कारवाई करून 6501600 रुपयांचा निधी वाहतूक पोलिसांनी गोळा केला आहे. 2020 सालच्या तुलनेत गेल्या वर्षी वाहतूक पोलिसांनी सहा लाख रुपयांचा अधिक महसूल दंडात्मक कारवाई करून गोळा केला आहे.

<div class="paragraphs"><p>Ponda traffic police  </p></div>
फिलू डिकॉस्ताने ग्रेटर पणजी पीडीए सदस्यत्वाचा दिला राजीनामा

गत साली सर्वाधिक विना हेल्मेट दुचाकीचालकाविरुध्द दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच दुचाकीवर ट्रिपल सीट 750, विनासीट बेल्ट 8578, नो एंट्री 3760, व्यवस्थित नंबर नसलेले 4120, नंबर नसलेले 1290, धोकादायक ठिकाणी पार्किंग 7278 धोकादायकरीत्या वाहने हाकणे 509, वाहन चालवताना भ्रमणध्वनीवर बोलणे 218, विना परवाना 400, मद्यपान करून वाहन चालवणे 26, वाहनाचे दिवे बरोबर नसलेले 447 व इतर वाहनचालकांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. फोंडा वाहतूक पोलिस हद्दीत येणाऱ्या 2020 साली व 2021 साली कोरोना महामारीच्या काळात मद्यपान करून वाहन चालवणारे कमी दिसून येत आहे.

<div class="paragraphs"><p>Ponda traffic police  </p></div>
गोव्यात नाव, आडनाव बदलासाठी कडक नियम

अल्पवयीनांकडून दुचाकींचा वापर

फोंडा वाहतूक पोलिसांकडून वाहतूक व्यवस्था चोख ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अल्पवयीन मुलांकडून दुचाकींचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. नाक्यावर पोलिसांना पाहताच हे परवाना नसलेले अल्पवयीन दुचाकीस्वार पळ काढतात. फोंडा तसेच कुर्टी भागात अल्पवयीन मुलांकडून दुचाकींचा सर्रासपणे वापर सुरू आहे. अपघात करून पळ काढण्याचे प्रकारही फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडत असल्याने पोलिसांनी अशाप्रकारावर मोहीम कडक करण्याची गरज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com