पोरस्कडे येथील महामार्ग पुन्हा धोकादायक

प्रतिनिधी
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

पेडणे तालुक्यातील पोरस्कडे ते रेल्वे पुलापर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग  ६६ हा परत एकदा धोकादायक स्थितीत बनला आहे . रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला असून रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वाहने चालवताना, पाण्याचा अंदाज न आल्याने दोन वाहने अर्ध्याआधिक बुडाली.

पेडणे:  पेडणे तालुक्यातील पोरस्कडे ते रेल्वे पुलापर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग  ६६ हा परत एकदा धोकादायक स्थितीत बनला आहे . रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला असून रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वाहने चालवताना, पाण्याचा अंदाज न आल्याने दोन वाहने अर्ध्याआधिक बुडाली.

राष्ट्रीय महामार्ग ६६ या रस्त्यावरील पोरस्कडे ते रेल्वे पुला पर्यंतचा मागच्या दोन महिन्यापूर्वी हा रस्ता १०० मीटर रस्ता खचून संरक्षण भीती सहित तेरेखोल नदीत वाहून गेला होता . अधिक चारशी मीटर लांबीचा रस्ता खचला होता . एमं व्ही आर कंपनीच्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे . आज परत एकदा तिथलाच रस्ता खचला असून रसत्यावर पूर्णपणे पाणी साचून तलाव निर्माण झाला . वाहने चालवताना एका बाजूकडून दुसऱ्या बाजूने जात होती . मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर साचल्यामुळे दोन चारचाकी वाहने पाण्यात अडकून पडली.

मागच्या वेळी खचलेला १०० मीटर रस्त्यावर ठेकेदाराने तेरेखोल नदीच्या बाजूने संरक्षण भिंत न बांधता तसाच मातीचा भराव घालून रस्त्याची डागडुजी केली होती , गेल्यावेळी रस्ता कोसळला  होता त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर ,उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर व अधिकाऱ्याने तातडीने धाव घेवून घटनास्थळाची पाहणी केली होती . त्यावेळी मंत्र्याने ठेकेदाराना परत ५०० मीटर रस्ता नव्याने  करण्याचा आदेश दिला होता . दुसऱ्या दिवशी  पासून ठेकेदाराने केवळ मातीचा भराव टाकून रस्त्याची मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला होता.

१८ रोजी या रस्त्याची पूर्णपणे परत एकदा वाताहत झाली आहे . रस्त्यावर पाणी खेळत होती , काही रस्ता परत खचत होता , चिखलमय रस्त्यातून वाहने चालवणे म्हणजे जीव धोक्यात  घालून चालावण्यासारखे  होते.

राष्ट्रीय महामार्गाचे पत्रादेवी ते करासवाडा या पर्यतच्या पहिल्या टप्प्यातील रस्त्यावर ४८० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे . आणि या रस्त्याचा ठेका भाजपा सरकारचे आवडते ठेकेदार एव्ही आर कंपनीला दिलेला आहे .   ठेकेदाराने सुरुवातीपासून या रस्त्याचे काम मनमानी काराभारानुसार केलेले आहे . या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी लागणारी अतिरिक्त जमीन संपादित न करता हुकुमशाही पद्धतीने सरकारने जमिनीवर अतिक्रमण करून रस्ता रुंदीकरण केला , स्थानिकाना विश्वासात न घेता हे काम केले . पाहिजे तिथे भलेमोठे डोंगर कापून रस्त्यासाठी लोबर माती मिळवली , स्थानिकांना हवे त्या ठिकाणी भूमिगत पूल न उभारता ठेकेदाराच्या मनाला येयेल तिथ पूल उभारलेले आहे . विर्नोडा वारखंड या जनक्षनकडे भूमिगत पुलाची  आवश्यकता असतानाही त्या ठिकाणी पूल उभारले गेले नाही .

स्थानिक उपसरपंच सुबोध महाले यांनी प्रतिक्रिया देताना हा रस्ता ७०० मीटर परत तेरेखोल नदीच्या पात्रात जलसमाधी घेणार आहे . सरकारला त्याचे काहीही पडलेले नाही . अनेकवेळा सरकारकडे या रस्त्याचे काम करताना स्थानिकांना विश्वासात घेऊन काम करा अशी मागणी केली मात्र दखल घेतली नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

तेरेखोल नदीतून अमर्याद रेती उपसा चालू असल्याने या रस्त्याला धोका निर्माण झाला आहे .पेडणे तालुक्यातील पत्रादेवी ते धारगळ पर्यंतचा राष्ट्रीय रस्ता क्रमांक ६६ हा रास्ता  पूर्वीपासून वादग्रस्त ठरलेला आहे. 

केंद्र सरकारच्या निधीतून पत्रादेवी ते करासवाडा पर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील रस्त्यावर ४८० करोड  रुपये खर्च करण्यात येत आहे . पत्रादेवी ते कोलवाळ पूल पर्यंत या रस्त्याला ठीक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत.

संबंधित बातम्या