'पर्वरीतील पाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही तर कार्यालयाला ताळे ठोकू'

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

शहराच्या पाणी प्रश्नासाठी पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांचे पीडब्ल्यूडी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.

पर्वरी-  पाणी पुरवठा विभाग शहरातील पाण्याच्या प्रश्नाकडे काळजीपूर्वक दुर्लक्ष करत असून लोकांच्या समस्यांकडे बघायला त्यांना वेळ नाही, असे आरोप करत पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी पाणी पुरवठा विभागावर जोरदार हल्ला चढवला.

शहराच्या पाणी प्रश्नासाठी पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांचे पीडब्ल्यूडी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. शहरातील पाणी प्रश्नाकडे संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष दिले नाही तर कार्यालयाला ताळे ठोकण्याची ताकीदही आमदार रोहन खंवटे यांनी यावेळी दिली.   

संबंधित बातम्या