राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता 

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

गोवा आणि कोकण किनारपट्टीवर सुमारे ४० ते ५० किमी प्रतितास इतका वाऱ्याचा वेग असणार आहे. त्यामुळे मासेमाऱ्यांना समुद्रात न उतरण्यासाठीचा इशारा देण्यात आला आहे. आज दिवसभरात काही ठिकाणी पाऊस पडला,  तर काही ठिकाणी पाऊस पडला नाही.  

पणजी- पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता गो वेधशाळेने वर्तवली आहे. याशिवाय गोवा आणि कोकण किनारपट्टीवर सुमारे ४० ते ५० किमी प्रतितास इतका वाऱ्याचा वेग असणार आहे. त्यामुळे मासेमाऱ्यांना समुद्रात न उतरण्यासाठीचा इशारा देण्यात आला आहे. आज दिवसभरात काही ठिकाणी पाऊस पडला,  तर काही ठिकाणी पाऊस पडला नाही.  

  गेल्या चोवीस तासात म्हापसा येथे ००४.२ मि.मी., पेडणे येथे ०१०.८ मि.मी., फोंडा येथे ००१.८ मि.मी.,  पणजी येथे ००९.९ मि.मी.,  जुने गोवा येथे ०११.० मि.मी.,  साखळी येथे ०१३.६ मि.मी.,  वाळपई येथे ००४.२ मि.मी.,  काणकोण येथे ००९.६ मि.मी.,  दाबोळी येथे ००७.४ मि.मी.,  मडगाव येथे ००४.४ मि.मी.,  मुरगाव येथे ००३.८ मि.मी.,  केपे येथे ००५.२ मि.मी. आणि सांगे येथे ००१.२ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

संबंधित बातम्या