काँग्रेस-गोवा फॉरवर्डचे मनोमीलन

अपात्रता याचिकेला पाठिंबा : युतीवर शिक्कामोर्तब, लवकरच घोषणा, काँग्रेस (Congress) व गोवा फॉरवर्ड (Goa Forward) यांच्‍यातील युतीसंदर्भात सुरू असलेल्या बोलणीवर जवळजवळ मनोमिलन झाल्याचेच हे संकेत आहेत.
काँग्रेस-गोवा फॉरवर्डचे मनोमीलन
काँग्रेस (Congress) व गोवा फॉरवर्ड (Goa Forward) यांच्‍यातील युतीसंदर्भात सुरू असलेल्या बोलणीवर जवळजवळ मनोमिलन झाल्याचेच हे संकेत आहेत.Dainik Gomantak

पणजी: काँग्रेस पक्षातर्फे सभापतींच्या निवाड्याला आव्हान दिलेल्या आमदार अपात्रता याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुनावणीवेळी आज गोवा फॉरवर्ड पक्षाने हस्तक्षेप याचिका सादर करत काँग्रेसच्या (Congress) याचिकेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून काँग्रेस व गोवा फॉरवर्ड (Goa Forward) यांच्‍यातील युतीसंदर्भात सुरू असलेल्या बोलणीवर जवळजवळ मनोमिलन झाल्याचेच हे संकेत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत युतीच्या घोषणेची शक्यता आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाने काँग्रेसला पाठिंबा देणारी हस्तक्षेप याचिका सादर केल्याने युतीचा मार्ग बहुतेक मोकळा झाल्याचे हे सूचक आहे.

गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांची काँग्रेसच्या केंद्रातील ज्येष्ठ नेत्यांबरोबर बोलणी होऊन सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. या युतीसाठी गोवा फॉरवर्डला किती जागा द्यायचा यासंदर्भातचा निर्णय केंद्राकडून होणार असल्याने युतीच्या घोषणेला विलंब होत आहे. मात्र, काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी युतीचे संकेत दिल्याने गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष सरदेसाई यांनीही त्याचे स्वागत केले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षामध्ये काही दिवसांपासून असलेले रुसवे - फुगवे हे काही प्रमाणात कमी झाल्याची चर्चा आहे.

काँग्रेस (Congress) व गोवा फॉरवर्ड (Goa Forward) यांच्‍यातील युतीसंदर्भात सुरू असलेल्या बोलणीवर जवळजवळ मनोमिलन झाल्याचेच हे संकेत आहेत.
गोवा फॉरवर्ड का सोडला याबद्दल सरदेसाई यांच्याकडून खुलासा..!

गोवा फॉरवर्डतर्फे सादर करण्यात आलेल्या मध्यस्थी याचिकेवरील सुनावणीवेळी ॲड. दत्तप्रसाद लवंदे यांनी बाजू मांडताना सांगितले, की ते काँग्रेसच्या याचिकेला पाठिंबा देत आहेत. याचिकेत ते उत्तर सादर करणार नाहीत. मात्र, या अपात्रतेसंदर्भात जे काही दस्ताऐवज जमा केले आहेत त्याच्या आधारे काँग्रेसला पाठिंबा देणारी बाजू मांडणार असल्याचे स्पष्ट केले.

काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये गेलेल्या 10 व मगोच्या 2 आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिकेवरील निवाड्यवेळी सभापती राजेश पाटणेकर यांनी याचिका फेटाळून त्या सर्व 12 आमदारांच्या बाजूने निवाडा दिला होता. या निवाड्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. घटनेच्या 10 परिशिष्टानुसार एखाद्या पक्षातील समितीचे तसेच विधीमंडळातील दोन तृतियांश आमदारांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे सक्तीचे आहे. मात्र, असे काँग्रेसच्या बाबतीत घडलेले नाही. दोन तृतियांश आमदार फुटून गेले असले, तरी काँग्रेस पक्ष अजूनही विलीन झालेला नाही. त्यामुळे सभापतींनी दिलेला निवाडा घटनेनुसार नसून तो अवैध व बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद काँग्रेसचे ज्येष्ठ वकील विवेक तांका यांनी केला.

काँग्रेसतर्फे सादर करण्यात आलेल्या अपात्रता याचिकेत उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, मंत्री फिलिप नेरी, मंत्री जेनिफर मोन्सेरात, आमदार बाबुश मोन्सेरात, आमदार क्लाफासिओ डायस, आमदार विल्फ्रेड डिसा, आमदार टोनी फर्नांडिस, आमदार फ्रांसिस सिल्वेरा, आमदार नीळकंठ हळर्णकर व उपसभापती इजिदोर फर्नांडिस, तर मगोतर्फे सादर करण्यात आलेल्या याचिकेत मंत्रा दीपक पाऊस्कर व उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचा समावेश आहे.

काँग्रेस (Congress) व गोवा फॉरवर्ड (Goa Forward) यांच्‍यातील युतीसंदर्भात सुरू असलेल्या बोलणीवर जवळजवळ मनोमिलन झाल्याचेच हे संकेत आहेत.
भाजप सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा: गोवा फॉरवर्ड

अंतिम सुनावणी 10 डिसेंबरला

काँग्रेस व मगोमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 12 आमदारांविरुद्ध दोन वेगवेगळ्या आमदार अपात्रता याचिका सादर करण्यात आल्या आहेत. यावेळी गोवा फॉरवर्डतर्फे काँग्रेसच्या याचिकेला पाठिंबा देणारी हस्तक्षेप याचिका सादर करण्यात आली. या तिन्ही याचिकांमध्ये सभापती तसेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांना गोवा खंडपीठाने नोटिसा बजावल्या आहेत. त्यांना या नोटिशींना 6 डिसेंबरपर्यंत उत्तर देण्यास मुदत दिली आहे. उत्तर व प्रत्युत्तर प्रक्रिया पूर्ण होऊन त्यावरील अंतिम सुनावणी 10 डिसेंबरला ठेवण्यात आली आहे.

अपात्रता याचिकांवर सभापतींकडून विलंब होत असल्याने निकाल देण्यासाठी संसदेत कायदा दुरुस्ती आणणे गरजेचे आहे. लोकांनी निवडून दिलेल्या आमदारांना दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करण्यावर आळा बसेल. गोवा खंडपीठासमोरील हा निवाडा देशातील इतर राज्यांना यापुढे लागू होईल.

- ॲड. तांका, काँग्रेसचे वकील

पक्षांतर करण्यावर बंदी यायला हवी या हेतूनेच ही हस्तक्षेप याचिका सादर करण्यात आली आहे. पालिका निवडणुकीवेळी कायद्याची पायमल्ली केली त्याला आव्हान दिल्यानंतर सरकारला नमते घेण्याची पाळी आली होती तीच स्थिती या आमदार अपात्रता याचिकेत होणार आहे.

- दुर्गादास कामत, गोवा फॉरवर्ड

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com