'भाजप' पक्षात बंडखोरी निर्माण होण्याची शक्यता; संतोष लोटलीकर

जर पक्षाने एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता नसलेल्याचा विचार केल्यास वास्को भारतीय जनता पक्षाच्या मंडळात बंडखोरी निर्माण होण्याची शक्यता आहे.
'भाजप' पक्षात बंडखोरी निर्माण होण्याची शक्यता; संतोष लोटलीकर
Goa Politics: 'भाजप' पक्षात बंडखोरी निर्माण होण्याची शक्यता; संतोष लोटलीकर Dainik Gomantak

दाबोळी : पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वास्को मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदार बनवून कार्लुस आल्मेदा हॅटट्रिक साधणार आहेत. जर पक्षाने एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता नसलेल्याचा विचार केल्यास वास्को भारतीय जनता पक्षाच्या मंडळात बंडखोरी निर्माण होण्याची शक्यता माजी वास्को भाजप गटाचे उपाध्यक्ष तथा माजी भाजप राज्य कार्यकारणी सदस्य संतोष लोटलीकर यांनी व्यक्त केली.

Goa Politics: 'भाजप' पक्षात बंडखोरी निर्माण होण्याची शक्यता; संतोष लोटलीकर
गिरीश चोडणकरांचा 'मुख्यमंत्र्यांना' टोला

गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत वास्कोत भाजपला विजयी करणारे आमदार आल्मेदा यंदा वास्कोत हॅटट्रिक साधणार आहे. आमदार आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली वास्कोत राज्य सरकारने अनेक विकास कामांना चालना दिलेली आहे. युवकांना सरकारी नोकऱ्या, रोजगार ,महिलांना सरकारी योजनेचा लाभ. यात वास्को भाजप मंडळ अग्रेसर असल्याची प्रतिक्रिया माजी भाजप राज्य कार्यकारणी सदस्य संतोष लोटलीकर यांनी दिली. वास्कोचे आमदार आल्मेदा सदैव भाजपच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात असून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात. यामुळे येथील सर्वसामान्य जनतेच्या नजरेत आल्मेदा यांना आदर आहे.

Goa Politics: 'भाजप' पक्षात बंडखोरी निर्माण होण्याची शक्यता; संतोष लोटलीकर
फळ व मासे विक्रेते अडकणार कायद्याच्या कचाट्यात

वास्को मतदार संघातून मुरगाव नगरपालिका निवडणुकीत यश संपादन करून एका प्रकारे विक्रम साध्य करून दाखवून आमदार आल्मेदा यांनी पुढाकार घेतला होता. पुढील वर्षी गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार कार्लुस आल्मेदा शंभर टक्के यश संपादन करणार आहे. वास्कोत भाजपला पुन्हा यशस्वी करण्यास आल्मेदा यांचा मोलाचा वाटा असणार असल्याची माहिती संतोष लोटलीकर यांनी दिली. वास्कोत भाजपला विजयी करण्यासाठी आमदार आल्मेदा हे प्रमुख असणार आहे. वास्कोत भाजपचा संपर्क दिवसेंदिवस वाढत असून जर राज्य भाजप कार्यकारिणी समिती एखाद्या पक्षातील नसलेल्या व्यक्तीला वास्कोत भाजपची उमेदवारी दिल्यास भविष्यात वास्को भाजप गटात बंडखोरी निर्माण होण्याची शक्यता लोटलीकर यांनी व्यक्त केली. भाजपचा मोठ्या प्रमाणात मतदार असून त्यांचे नेते कार्लुस आल्मेदा असून राज्य भाजप समितीने येणारी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा कार्लुस आल्मेदा यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी माजी वास्को भाजप उपाध्यक्ष संतोष लोटलीकर यांनी केली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com