कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्यावर राज्यात 'पोस्ट कोविड केअर सेंटर' सुरू करू- मुख्यमंत्री

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

प्रत्येक पीएचसी आणि सीएचसीमध्ये पोस्ट कोविड केअर सेंटर सुरू करू, अशी माहिती राज्याचे मख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज दिली. 

पणजी-  राज्यात कोरोनाची रूग्णसंख्या नियंत्रणात आल्यावर प्रत्येक पीएचसी आणि सीएचसीमध्ये पोस्ट कोविड केअर सेंटर सुरू करू, अशी माहिती राज्याचे मख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज दिली. 

राज्यातील कोविड केअर सेंटरबद्दल बोलताना सावंत पुढे म्हणाले, आम्ही कोविड केअर सेंटर बंद करत नाही आहोत. परंतु, जेथे रूग्णसंख्या कमी आहे त्याठिकाणचे रूग्ण इतर कोविड सेंटरमध्ये हलवण्यात येत आहेत. रूग्णसंख्या परत वाढतच असेल तर ते कोविड सेंटर परत सुरू केले जातील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.4  

संबंधित बातम्या