गोव्यातील ग्राहकांसाठी मुंबईत 22 मार्च रोजी डाक अदालत

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

मुख्य पोस्टमास्टर जनरलानी 22 मार्च रोजी 114 व्या डाक अदालतीचे आयोजन केले आहे. सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळालेले नसेल तर अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल.

पणजी: मुख्य पोस्टमास्टर जनरलानी 22 मार्च रोजी 114 व्या डाक अदालतीचे आयोजन केले आहे. गोवा राज्याशी संबंधित टपाल सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळालेले नसेल तर अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल.

मुख्यमंत्री प्रमोद सावंतांकडून आचारसंहितेचा भंग 

विशेषतः टपाल वस्तू, मनी ऑर्डर, बचत खाते, प्रमाणपत्र आदींबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा त्यात तारीख, तक्रार पाठविलेल्या अधिकाऱ्याचे नाव व पादनाव यांचा समावेश असावा. मुंबईतील कार्यालयात ही डाक अदालत आयोजित करण्यात येणार आहे.संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार एच. एम. मंगेश, सहायक निदेशक, डाक सेवा (ज. शी.) आणि सचिव डाक अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, मुंबई जी. पी. ओ. इमारत, दुसरामाळा, मुंबई - 400001 यांच्या नावे दोन प्रतिसह दि. 5 मार्च 2021 पर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचेल अशारीतीने पाठवावी. नंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. प्रपत्र महाराष्ट्र पोस्टल सर्कलच्या वेबसाईट www.maharashtrapost.gov.in वर उपलब्ध आहे.

 

 

संबंधित बातम्या