‘बार्देश बझार’ची निवडणूक पुढे ढकला

Bardez  Bazar
Bardez Bazar

म्हापसा

मरड, म्हापसा येथील बार्देश बझार ग्राहक सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी या सोसायटीच्या भागधारकांनी म्हापसा येथील उत्तर विभागीय सहकारी संस्था कार्यालयाचे सहाय्यक निबंधक तथा निवडणूक अधिकाऱ्यांकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर डॉ. गुरुदास नाटेकर, ई. व्ही. शेटगावकर, श्रीपाद एस. नाईक, शिवाजी राऊळ, नीळकंठ शेट, आत्माराम आमोणकर, किशोर ए. धारगळकर, पुतूश एल. पेडणेकर, सलीम इसानी, मंगला फोगेरी, आर. जी. प्रभू, एकनाथ म्हापसेकर, उल्हास साळवी, पांडुरंग सावंत, श्रीकृष्ण काणेकर, अशोक आरोंदेकर, निना लांजेकर, तुषार टोपले, श्‍याम फडते, रमेश नाईक इत्यादींच्या सह्या आहेत.
या निवेदनात भागधारकांनी नमूद केले आहे, की जून २०२० मध्ये होणार असलेली निवडणूक कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे पुढे ढकलण्यात यावी. आगामी काळात गोव्यात कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत अधिक धोका असल्याचे आरोग्य सचिव निला मोहनन यांनी नमूद केल्याचेही या निवेदनातून निदर्शनास आणून देण्यात आले आहे. त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी; तसेच, ती आगामी काळात सुयोग्य वेळी घेण्यात यावी, अशी मागणी भागधारकांनी केली आहे.
या संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यासाठी सहकार निबंधक कार्यालयातर्फे अलीकडेच मतदारांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्या यादीसंदर्भात कुणाचे आक्षेप असल्यास लेखी स्वरूपात कळवण्याचे आवाहन त्या अनुषंगाने करण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com