गोवा: मंत्र्यासमोरील सुनावणीला खंडपीठाची स्थगिती

गोवा: मंत्र्यासमोरील सुनावणीला खंडपीठाची स्थगिती
goa cout

पणजी: साखळी पालिकेचे नगरसेवक राजेश सावळ यांच्याविरुद्धच्या अपात्रता अर्जावरील सुनावणी उद्या 16 रोजी सकाळी 11 वा. नगरविकासमंत्र्यांसमोर ठेवण्यात आली होती, त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिल्याने सरकारला चपराक बसली आहे. साखळी पालिका सत्ता भाजप समर्थक गटाकडे ठेवण्यासाठी सरकारची खेळी त्यांच्याच अंगलट आली आहे. त्यामुळे नगराध्यक्षांविरुद्धचा अविश्‍वास ठरावारील बैठक उद्या 16 रोजी ठरल्यानुसार दुपारी 2.30 वा. होणार असल्याने व ही पालिका मुख्यंत्र्यांच्या मतदारसंघातील असल्याने राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. (Postponement of the bench for hearing before the Minister)

हल्लीच झालेल्या साखळी पालिकेच्या पोटनिवडणुकीत प्रभाग 9 मधून नगरसेवक धर्मेश सगलानी यांच्या गटातील उमेदवार निवडून आला होता व मुख्यमंत्र्यांना नामुष्की पत्कारावी लागली होती. त्यामुळे या पालिकेत 13 पैकी 7 नगरसेवक हे सगलानी गटातील आहेत. या गटाने नगराध्यक्षांविरुद्ध अविश्‍वास ठराव दाखल करून तो घेण्यास पालिका संचालनालयाकडून विलंब होत असल्याने उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. गोवा खंडपीठाने अविश्‍वास ठरावसाठीची बैठक 16 एप्रिलला घेण्याचे निर्देश पालिका संचालनालयाला दिले होते. 

आजच्‍या बैठकीकडे सर्वांचे लक्ष
साखळी नगराध्यक्षांविरुद्ध धर्मेश सगलानी गटाच्या सहा नगरसेवकांनी दाखल केलेल्या अविश्‍वास ठरावावर उद्या 16 रोजी दुपारी 2.30  वा. पालिका संचालकांनी बैठक बोलावली आहे. त्यामुळे नगरसेवक राजेश सावळ यांच्या अपात्रता अर्जावर उद्या 16 रोजी सकाळी 11 वा. बोगदा - वास्को येथील वीज खात्याच्या बंगल्यात नगरविकासमंत्र्यांनी सुनावणी ठेवली होती मात्र सावळ यांनी त्यांना अपात्रतसंदर्भात दिलेल्या नोटिशीला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते त्यावर आज सुनावणी होऊन स्थगिती दिली आहे. नगरविकासमंत्री, पालिका संचालक व पालिका मुख्याधिकारी या प्रतिवाद्यांना नोटीस बजावून त्यावरील सुनावणी 19 एप्रिलला खंडपीठाने ठेवली आहे. त्यामुळे अविश्‍वास ठराव घेण्यापूर्वी नगरसेवक राजेश सावळ यांना अपात्र ठरविण्याची खेळीत सरकारला अपयश आले आहे. गोवा खंडपीठाने 9 एप्रिल 2021 रोजी धर्मेश सगलानी यांच्या याचिकेत दिलेल्या आदेशात साखळी नगराध्यक्षांविरुद्धच्या अविश्‍वास ठरावावर 16 एप्रिलला बैठक घेण्याचे निर्देश दिले हो

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com