गोव्याचे माजी मंत्री रमेश तवडकर यांच्या शिक्षेला स्थगिती

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

खोतीगावातील पुनो वेळीप यांना तीन वर्षांपूर्वी वाटेत अडवून धमकी दिल्याप्रकरणात काणकोण प्रथमवर्ग न्यायालयाने दिलेल्या निवड्याविरोधात माजी मंत्री रमेश तवडकर यांनी दक्षिण गोवा सत्र न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली असून सत्र न्यायालयाने काणकोण प्रथमवर्ग न्यायालयाच्या शिक्षेच्या कार्यवाहीवर स्थगिती आणलेली आहे. पुढील सुनावणी २३ डिसेंबर रोजी होणार आहे.  

सासष्टी : खोतीगावातील पुनो वेळीप यांना तीन वर्षांपूर्वी वाटेत अडवून धमकी दिल्याप्रकरणात काणकोण प्रथमवर्ग न्यायालयाने दिलेल्या निवड्याविरोधात माजी मंत्री रमेश तवडकर यांनी दक्षिण गोवा सत्र न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली असून सत्र न्यायालयाने काणकोण प्रथमवर्ग न्यायालयाच्या शिक्षेच्या कार्यवाहीवर स्थगिती आणलेली आहे. पुढील सुनावणी २३ डिसेंबर रोजी होणार आहे.  

 

दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एडगर फर्नांडिस यांच्या न्यायालयात सदर सुनावणी सुरू असून तवडकर यांच्या वतीने धर्मानंद वेर्णेकर बाजू मांडत आहेत. 3 जानेवारी २०१७ रोजी पुनो वेळीप यांनी माजी मंत्री तवडकर यांच्या विरोधात काणकोण पोलिसात तक्रार दाखल केली होती. आपल्या मित्रा समवेत मोटारसायकलवरून चावडीवर येत असताना पाठीमागून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसलेल्या तवडकर यांनी पाठलाग करून थांबण्याचा इशारा केला. मात्र आम्ही थांबत नसल्याचे बघून मोटारसायकल समोर कार थांबवून जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार त्यांनी पोलिसात दाखल केली. धमकी दिल्याचा आरोप सिद्ध झाल्याने काणकोण प्रथमवर्ग न्यायालयाने तवडकर यांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावताना न्यायासन उठेपर्यंत न्यायालयात बसून राहण्याची शिक्षा ठोठावली होती.

अधिक वाचा :

गोवा कायदेमंत्र्यांच्या वक्तव्याचा अखिल भारतीय वकील संघटनेकडून निषेध

अकबर मुल्लाची ‘ईओसी’कडून चौकशी

गोवा सरकार आता ‘टॉप गियर’मध्ये!

संबंधित बातम्या