लोलये पंचायत क्षेत्रात भूमिगत वीजजोडणी

प्रतिनिधी
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

लोलये पंचायत क्षेत्रातील काही भागात भूमिगत वीज वाहिन्याची जोडणी देण्याचे काम सुरू झाले आहे.

काणकोण: लोलये पंचायत क्षेत्रातील काही भागात भूमिगत वीज वाहिन्याची जोडणी देण्याचे काम सुरू झाले आहे.

२०१७ मध्ये कुळटी सबस्टेशन पासून माशेपर्यंत वीज वाहिनी आणण्यात आली होती मात्र माशे येथील वीज ट्रान्सफॉर्मरला त्याची जोडणी देण्यात आली नव्हती. सध्या माशे गावाला भगवती पठारावरून सुमारे ४५ वर्षांपूर्वी घातलेल्या ३३ केव्ही  ओव्हरहेड वीज वाहिन्यावरुन वीज पुरवठा करण्यात येत होता.पावसाळ्यात या ओव्हरहेड वीज वाहिन्यावर झाडे उन्मळून पडल्याने या भागाचा वीज पुरवठा खंडीत होत होता.गेल्या आठवड्यात वादळ वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे या वीज वाहिन्यांवर झाडे पडल्याने दोन दिवस या भागाचा वीज पुरवठा खंडीत झाला. 

त्याची दखल उपसभापती व काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडीस यांनी घेऊन ११ ऑगस्टला वीज खात्याच्या अभियंत्याची तातडीची बैठक घेऊन भूमिगत वीज वाहिनीची जोडणी ट्रान्सफॉर्मरला देण्याचे निर्देश वीज अभियंत्यांना दिले त्याप्रमाणे शनिवारी व रविवारी वीज कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर वीज जोडणी 
दिली.

यासाठी उपसभापती फर्नांडीस यांनी वीज कर्मचाऱ्यांचे आभार मानले.या वेळी लोलयेचे सरपंच निशांत प्रभुदेसाई, पंच भूषण प्रभुगावकर, सचिन नाईक उपस्थित होते.

goa

संबंधित बातम्या