Goa: पिसुर्ले येथे विज नियंत्रण पॅनल बॉक्सला लागली आग

Goa: पिसुर्ले येथे विज नियंत्रण पॅनल बॉक्सला लागली आग
power control panel

पिसुर्ले :  पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील गावकर आणि पंचायत वाड्यावरील नागरिकांना विज पुरवठा करण्यात येणाऱ्या सरकारी माध्यमिक विद्यालया जवळ असलेल्या विज ट्रान्सफोर्मर खाली असलेल्या विज नियंत्रण पॅनल बॉक्सला आज सकाळी सुमारे आठच्या दरम्यान अचानक आग लागून संपुर्ण पॅनल बॉक्स जळून खाक झाले, यामुळे विज खात्यांचे सुमारे पन्नास हजारांच्या आसपास नुकसान झाले असा अंदाज होंडा विज केंद्रांचे कनिष्ठ अभियंता माजीक यांनी व्यक्त केला आहे.

या संबंधी माहिती देताना माजीक यांनी सांगितले की, सदर विज ट्रान्सफोर्मर वरून वितरीत केलेल्या विज वाहीनीच्या काही तरी संपर्कात आल्याने विज नियंत्रण व प्युज संरक्षणासाठी बसवलेल्या पॅनल बॉक्सला आग लागली, सदर बॉक्स फायबरच्या साह्याने तयार केलेले असल्याने ते संपुर्ण जळून खाक झाले, यामुळे चाळीस ते पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे, सदर आगी मुळे विज ट्रान्सफोर्मरचे काहीच नुकसान झाले नाही, या ट्रान्सफोर्मरवरून पिसुर्ले गावकर व पंचायत वाडा भागातील नागरिकांना विज जोडणी देण्यात आली आहे, त्यामुळे या भागातील नागरिकांचा विज पुरवठा अर्धा दिवस खंडित झाला. या प्रकरणाची दखल घेऊन वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी नवीन बॉक्स उभे करण्याचे काम त्वरित हाती घेण्यात आले असल्याचे यावेळी माजीक यांनी सांगितले.

दरम्यान या पंचायत क्षेत्रात विविध ठिकाणी विज ट्रान्सफोर्मर असून, त्यामुळे आज घडलेल्या घटनेवरून त्या ठिकाणी असलेल्या विज नियंत्रण व प्युज संरक्षणासाठी बसवलेल्या पॅनल बॉक्सच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, विज खात्याने पंचायत क्षेत्रातील सर्व विज ट्रान्सफोर्मरची पहाणी करून फार जुनी झालेली यंत्रणा नवी करावीं अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com