राज्यात उच्च दाबाच्या वीज वाहिनीची गरज

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

 राज्यभरात घरगुती विजेचा वापर गेल्या दहा वर्षांत ८ लाख २२ हजार चारशे सहा किलोवॅटने वाढला आहे, तर वाणिज्यिक विजेचा वापर गेल्या दहा वर्षांत एक लाख चौसष्ट हजार सातशे एक किलोवॅटने वाढला आहे. विजेच्या वापरात जशी वाढ झाली आहे तशीच वाढ वीज वापर करणाऱ्यांच्या संख्येतही झाली आहे. त्यामुळे तम्नार गोवा उच्च दाबाच्या वीज वाहिनीची गरज आहे, अशी माहिती वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी आज पर्वरी येथे पत्रकार परिषदेत दिली.

पणजी : राज्यभरात घरगुती विजेचा वापर गेल्या दहा वर्षांत ८ लाख २२ हजार चारशे सहा किलोवॅटने वाढला आहे, तर वाणिज्यिक विजेचा वापर गेल्या दहा वर्षांत एक लाख चौसष्ट हजार सातशे एक किलोवॅटने वाढला आहे. विजेच्या वापरात जशी वाढ झाली आहे तशीच वाढ वीज वापर करणाऱ्यांच्या संख्येतही झाली आहे. त्यामुळे तम्नार गोवा उच्च दाबाच्या वीज वाहिनीची गरज आहे, अशी माहिती वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी आज पर्वरी येथे पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, या वीज वाहिनीला विरोध होत आहे, पण घरगुती वीज वापर राज्यात वाढत आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यासाठीच आज विजेच्या वापरावर ही श्वेतपत्रिका जारी करत आहे. २०१०-११ मध्ये १० लाख ५५५ किलोवॅट इतकी वीज घरगुती वापरासाठी वापरली जात असे. यावर्षी सप्टेंबरपर्यंत विजेच्या वापराचा आकडा १८ लाख २२ हजार ९६१ किलोवॅटपर्यंत पोहचला आहे, तर वाणिज्यिक वीज वापर २०१०-११ यावर्षी २ लाख ८६४ किलोवॅट इतका होता, जो चालू वर्षी सप्टेंबरपर्यंत ४ लाख ३५ हजार ४६५ किलोवॅटच्या घरात पोहचला आहे. वीज वापरात या दोन्ही क्षेत्रात झालेली ही मोठी वाढ आहे.

हॉटेल्स आणि इतर औद्योगिक तसेच उच्च दाबाच्या विजेचा वापर करणाऱ्या क्षेत्राच्या वीज वापरातही विजेचा वापर वाढला आहे. २०११-१२ साली विजेचा या क्षेत्रातील वापर ३ लाख ३६ हजार ७६५ किलोवॅट होता. चालू वर्षी हा वापर सप्टेंबर महिन्यापर्यंत ६ लाख ७१ हजार ८२ किलोवॅट इतका आहे . म्हणजेच येथे २ लाख ३४ हजार ३१७ किलोवॅट इतका वीज वापर वाढला आहे. वीज वापरकर्त्यांची संख्याही गेल्या दहा वर्षांत चांगलीच वाढली आहे. घरगुती वीज ग्राहकांची आकडेवारी पाहिली, तर २०१०-११ साली ही संख्या ३ लाख ७१ हजार २२८ अठ्ठावीस होती, तर यावर्षी सप्टेंबरपर्यंत ही संख्या ५ लाख ४९ हजार ३८६ इतकी झाली आहे. म्हणजेच ग्राहकांच्या संख्येत २ लाख ३८ हजार १५८ इतकी वाढ आहे.

वाणिज्यिक क्षेत्राच्या विस्ताराचा परिणाम वीज वापर वाढीवरही झाला आहे. या क्षेत्रात २०१०-११ साली वीज ग्राहकांची संख्या ६८ हजार ८५१ इतकी होती, जी यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत १ लाख ११७ झाली आहे. हॉटेल आणि इतर व्यावसायिक उद्योगांचा विस्तारही गेल्या दहा वर्षात लक्षणीय वाढला आहे. त्यामुळे या क्षेत्रातही वीज ग्राहक वाढले आहेत, असे ते म्हणाले.

राज्यात वीज पुरवठा करणाऱ्या फिडरची संख्या वाढविण्यात आली आहे. २०१०-११ साली २८० इतके फिडर होते, यावर्षी सप्टेंबरपर्यंत फिडरची संख्या २८ ने वाढली असून ३०८ इतकी झाली आहे.
राज्यातील वीज वाहिन्यांची लांबी पाहिली असता ही लांबी २०१०-११ साली १४  हजार ५६ किलोमीटर इतकी होती जी आता २१ हजार १८७ किलोमीटर इतकी वाढली आहे. ही वाढ ७ हजार १३७ किलोमीटर अंतराने वाढली आहे. वीज वाहून नेणारे कमी दाबाचे विजेचे खांबही या वीज वापर वाढीमुळे वाढले आहेत. २०१०-११ खांबांची संख्या राज्यभरात २ लाख ८ हजार ५७ इतकी होती, जी मागील महिन्यापर्यंत २ लाख ८४  हजार ८८८ इतकी झाली असून ती संख्या ७५ हजार ८३१ ने वाढली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

संबंधित बातम्या