जनतेला आणखी वेठीस धरू नका

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

कोरोना’मुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिकदृष्ट्या परीस्थिती बरीच दयनीय झालेली असताना राज्य सरकारने नुकतीच केलेली वीज दरवाढ वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी त्वरित मागे घ्यावी,

मुरगाव ‘कोरोना’मुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिकदृष्ट्या परीस्थिती बरीच दयनीय झालेली असताना राज्य सरकारने नुकतीच केलेली वीज दरवाढ वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी गोवा सुरक्षा मंचने केली आहे. ‘कोरोना’च्या संकटातून जनता अजूनही मुक्त झालेली नाही. त्यामुळे लोकांची आर्थिक कोंडी झाली आहे. कोणाचे पगार कमी झालेत, कोणाची नोकरीच गेली आहे.

जगावे कसे? असा प्रश्न लोकांना सतावत असताना वीज खात्याने दरवाढीची तलवार जनतेच्या मानेवर ठेवली आहे, असे गोवा सुरक्षा मंचचे युवा अध्यक्ष नितीन फळदेसाई यांनी म्हटले आहे. कोळशाचे दर‌ वाढल्याचे सांगत गोवा सरकारने नुकतीच वीज दरवाढ केली आहे. घरगुती वीजेसह व्यावसायिक विजेचे दरही वाढवले आहेत. कोळशाचा दर‌ वाढला तर सरकारने जबाबदारी घ्यावी, लोकांना आणखी वेठीस धरू नका, केलेली दरवाढ त्वरीत मागे घ्या, अशी मागणी गोवा सुरक्षा मंचची असल्याचे श्री. फळदेसाई यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या