चाफेरान वास्कोत विजेचा लपंडाव

वार्ताहर
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

मेर्सिस वाडे चाफेरान वास्को भागात गेले दोन महिने विजेचा लपंडाव सुरूच आहे. यामुळे येथील रहिवाशांना खूपच त्रास सहन करावा लागला. अनेक वेळा वीज विभागात तक्रार नोंदवूनसुद्धा वीज गुल होण्याचे सत्र सुरूच असल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  

दाबोळी मेर्सिस वाडे चाफेरान वास्को भागात गेले दोन महिने विजेचा लपंडाव सुरूच आहे. यामुळे येथील रहिवाशांना खूपच त्रास सहन करावा लागला. अनेक वेळा वीज विभागात तक्रार नोंदवूनसुद्धा वीज गुल होण्याचे सत्र सुरूच असल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  
                
संपूर्ण गोव्यात वीज विभागाकडून विजेचे बिल दामदुपटीने आल्याने मध्यमवर्गीयाबरोबर गरिबी रेषेखालील नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसलेला आहे. यामुळे सरकार विरोधात विविध प्रकारे आंदोलने राजकीय पक्षांनी करून सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुरगाव पालिकेच्या प्रभाग २५ मधील मेर्सिस वाडे भागात गेल्या दोन महिन्यापासून जास्त करून सकाळच्या सत्रात वीज गायब होण्याचे सत्र चालूच आहे. यामुळे रोजंदारीवर जाणाऱ्यांना याचा खूपच त्रास होत आहे. वास्को विद्युत भवनात भागात वीज गुल होण्याची तक्रार नोंदवून सुद्धा विजेचा लपंडाव चालूच आहे. या भागात अनेक घरे असून एकच ट्रान्सफॉर्मर असल्याने दररोज जास्त करून सकाळच्या सत्रात वीज गुल असते तर दुपारच्या, रात्रीच्या सत्रात सुद्धा वीज गुल होत राहते.

चाफेरान भागात आणखीन एक विजेचा ट्रान्स्फॉर्मर बसविण्याची मागणी सध्या या भागातील रहिवाशांकडून होत आहे. तसेच चतुर्थीपूर्वी विजेच्या खांबावर विजेचे दिवे बसवले होते पण वीज विभागाने काही खांबावर विजेचे दिवे बसवले नसल्याने रहिवाशांनी या विषयी वीज विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना यांची माहिती देऊन सुद्धा, आज पर्यंत विजेचे दिवे बसविलेले नाही.  राज्य वीज विभागाने त्वरित वास्को भागातील रहिवाशांचे विषयी उद्भवलेल्या समस्याचे प्रश्न सोडवावे अशी मागणी येथील रहिवाशांकडून होत आहे. goa
 

संबंधित बातम्या