फोंड्यात विजेचा लपंडाव सुरूच

भुरट्या चोरांची भीती: वीजमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी
फोंड्यात विजेचा लपंडाव सुरूच
Power outages in PondaDainik Gomantak

फोंडा: काल पडलेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा फोंड्यात विजेचा लपंडाव सुरू झाला. सायंकाळी सहाच्या सुमारास फोंड्यात पाऊस सुरू झाला. त्यानंतर वीज खंडित होण्याचे प्रकार सुरू झाले. काही ठिकाणी रात्रभर विजेचा लपंडाव सुरूच होता. त्यामुळे लोक त्रस्त झाले.

काल फोंड्यात गडगडाटाशिवाय पाऊस पडला. तरीही लगेच वीज खंडित झाली. त्यामुळे लोकांना झोपणेसुद्धा अशक्य झाले. आत्ता ही परिस्थिती आहे, तर मुख्य पावसाळा सुरू झाल्यावर काय अवस्था होईल, या विचाराने अनेकांची झोप उडाली आहे.

Power outages in Ponda
ग्रामीण भागात साधनसुविधा उपलब्ध करणार: गोविंद गावडे

पावसाळा हा निसर्गाचा एक घटक असल्यामुळे त्याची तयारी आधीच करायची असते. मात्र तसे होत नसल्याने विजेच्या लपंडावाला लोकांना तोंड द्यावे लागते. फोंड्याच्या ग्रामीण भागात तर बऱ्याच ठिकाणी रात्रभर वीज गायब होते. आता फोंडा तालुक्यात वीजखात्याने मॉन्सूनपूर्व दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत; पण दरवर्षी अशी कामे होऊनही पावसाळ्यात लोकांवर अंधारात राहण्याची पाळी येते, हे दिसून आले आहे. वीज कर्मचाऱ्यांची कामापोटी असलेली ‘अनास्था’ याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वीजखात्याचा ताबा घेतलेल्या मंत्री सुदिन ढवळीकर यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे

Power outages in Ponda
हरवळे धबधबा अजूनही प्रवाहित

वीजखात्याचा नागरिकांशी दैनंदिन संबंध येत असल्याने हे खाते महत्त्वाचे मानले जाते. आज जवळजवळ सर्व उपकरणे विजेवर अवलंबून असल्याने वीज खंडित झाल्यास त्याचा परिणाम ग्राहकांच्या दैनंदिन जीवनावर होतो. तसेच भुरटे चोरही अंधाराचा फायदा घेऊन सर्वसामान्यांना हिसका दाखवत असतात. त्यामुळे वीजमंत्र्यांनी खात्याच्या कारभारात लक्ष घालून ग्राहकांना पावसाळ्यात येणाऱ्या संभाव्य अडचणीतून मुक्त करावे; अन्यथा येणारे चार महिने हे ग्राहकांच्या दृष्टीने ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ असे ठरू शकतात, असे बोलले जात आहे. वीजमंत्री यात लक्ष घालून विजेवर अवलंबून असलेल्या असंख्य ग्राहकांना तसेच औद्योगिक आस्थापनांना अभय देतात की नाही, याचे उत्तर येत्या महिन्याभरात मिळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.