कोलवाळ परिसरात वीज खंडित; नागरिक हैराण

कोलवाळ पंचायत क्षेत्रात मागील सात-आठ दिवसांपासून, वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने स्थानिक हैराण झाले आहेत.
electricity
electricity Dainik Gomantak

कोलवाळ पंचायत क्षेत्रात मागील सात-आठ दिवसांपासून, वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने स्थानिक हैराण झाले आहेत. कोलवाळ ते रेवोडाच्या 11केव्ही वीज वाहिन्यांची तातडीची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

electricity
व्हिडीओ सर्वेक्षण प्रणालीसाठी वास्को रेल्वे स्थानकाची निवड

मागील सात-आठ दिवसांपासून कोलवाळ ते रेवोडा परिसरातील लोकांना खंडित वीजपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार खंडित वीजपुरवठ्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत. दिवसांतून कुठल्यावेळी वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे.

यासंदर्भात माजी पंचसदस्य रितेश वारखंडकर म्हणाले, ‘कोलवाळ ते रेवोडा परिसरातील 11केव्ही वाहिन्यांवर बिघाड झाल्याचे दिसते. त्यामुळे हा वीजपुरवठा खंडित होत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देऊन ही समस्या सोडवावी.’

पावसात सायंकाळच्या वेळी हा वीजेचा लंपडाव जास्त होत असल्याने खूप त्रास होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com