येत्या सोमवारी मंगेशी, फोंडा परिसरातील बत्ती गुल

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 1 मे 2021

मंगेशी भागात विजेचे दुरुस्तीकाम येत्या सोमवारी 3 रोजी घेण्यात येणार असून दुरुस्तीकाळात मंगेशी परिसर, चर्च कॉलनी तसेच हडयेवाडा व इतर भागात वीजपुरवठा खंडित असेल.

general मडकई: मंगेशी भागात विजेचे दुरुस्तीकाम येत्या सोमवारी 3 रोजी घेण्यात येणार असून दुरुस्तीकाळात मंगेशी परिसर, चर्च कॉलनी तसेच हडयेवाडा व इतर भागात वीजपुरवठा खंडित असेल. सकाळी आठ ते संध्याकाळी पाचपर्यंत हा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असे वीज खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

वीज खात्याला फोंडा भागात विविध ठिकाणी पावसाळापूर्व दुरुस्तीकाम हाती घ्यावयाचे असल्याने या दुरुस्तीकाळात विविध ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. येत्या मंगळवारी 4 रोजी शापूर, चिरपुटे, आंबेगोळ तसेच इतर भागात वीजपुरवठा सकाळी आठ ते दुपारी एकपर्यंत खंडित करण्यात येणार आहे.

पेडणे तालुक्यात आजपासून सहा दिवस वीजपुरवठा खंडित 

गुरुवारी 6 रोजी हवेली, नागझरी, अंत्रुजनगर, पंडितवाडा, वरचा  बाजार, काझिवाडा, कुडतरकर आर्केड, पोलिस स्थानक परिसर, सदर, सुमित क्‍लासिक, नागामशिद, वारखंडे, सावईकर इस्पितळ व आल्मेदा हायस्कूल परिसर, खडपाबांध, रवीनगर व इतर भागात सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येईल. दरम्यान, शुक्रवारी 7 रोजी सकाळी आठ ते दुपारी दोनपर्यंत मेस्तवाडा, कीर्ती हॉटेल परिसर, साईनगर, तळे, दुर्गाभाट, साईराज पार्क, सहकारी फार्म, कोपरवाडा व इतर भागात वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असे वीज खात्याने कळवले आहे.

संबंधित बातम्या