चक्रीवादळामुळे पर्वरी परिसरात 36  तास वीजपुरवठा खंडित

(Power supply
(Power supply

पर्वरी: पर्वरी परिसरात 36  तास वीजपुरवठा (Power supply) खंडित झाला. ग्रामस्थांना वीज नाही, म्हणून ना पाणी, ना इंटरनेट , ना फोन, ना अन्य व्यवस्था यापासून वंचित राहावे लागले. जर मदतीसाठी कोणाकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न करावा, तर यंत्रणा ठप्प झाली होती. त्यामुळे येथील ग्रामस्थ सरकारच्या नावाने अक्षरशः शंख नाद करीत होते. पर्वरी परिसर हा कॉस्मोपॉलिटन सिटीत’ मोडत असल्याने दर दिवसी येथे अनेक लोकांची ये-जा होत असते. त्यामुळे नवीन व्यक्ती कोणाच्या घरी आली, याचा थांगपत्ता लागत नाही. सर्व अलबेल चालत आहे. पर्वरी कोरोना संसर्गाबाबतीत ‘हॉटस्पॉट’ होण्याचे  हे एक प्रमुख कारण आहे.  सध्या कोरोनाबाधित लोकांची संख्या दीड हजाराच्या वरती गेली असून दर दिवशी अनेक लोकांचे बळी जात आहेत. (Power outage in Parwari area for last 36 hours)

गेल्या महिन्यात वीज खात्याने पर्वरीच्या अनेक भागात मान्सूनपूर्व कामाच्या नावाखाली अनेक वेळा ‘शटडाऊन’ केले होते. वीज वाहिन्या तुटून पडल्या, झाडाच्या फांद्या तुटून पडल्या, ट्रान्सफॉर्मर निकामी झाले. त्यामुळे वीज खात्याने ‘शटडाऊन’नावाखाली काय दिवे लागले ते उघड झाले आहे, अशी टीका एका ग्रामस्थाने  केली आहे. वेधशाळेने चक्रीवादळाची पूर्व सूचना चार-पाच दिवसापूर्वी दिली होती. पण  सरकार आपापसांतल्या भांडणात गर्क होते. वीज खात्याने कोणतीच आपत्कालीन व्यवस्था ठेवली नाही. उलट आमच्या खात्यात पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. वादळामुळे पडझड होऊ शकते, हे माहीत असतानासुद्धा पर्वरी वीज खात्यातील सहाय्यक अभियंता तसेच कनिष्ठ अभियंता रजेवर गेले होते. खरे तर वादळाच्या काळात वीज खात्याने वेगळी रचना करून जादा कर्मचारी वर्ग कामावर ठेवायला पाहिजे होता. तसे न करता खुशाल त्यांना त्या दिवशी रजा मोकळे केले होते. याचा विचार होणे गरजेचे आहे.

पर्वरी हा कोविड संदर्भात संवेदनशील भाग असून त्यात ही वीज समस्या निर्माण झाली आहे. वीज नाही, म्हणून पाणीपुरवठा होत नाही, अशा स्थितीत कोरोना बाधित लोक जे ‘गृहअलगीकरणात’ आहेत काय करायचे. मला  लोकप्रतिनिधी म्हणून  जाब विचारीत आहेत. पाणीपुरवठा खात्यात आठवड्याच्या पहिल्या दिवशी ‘बिल भरणा’ करायला गेलेल्या लोकांना  ते सांगतात संबंधित कर्मचाऱ्याची आज सुट्टी आहे. म्हणजे रविवारी त्या माणसाने काय केले, असे आमदार रोहन खंवटे यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.पर्वरी वीज खात्यात आणि पाणीपुरवठा खात्यात सर्व काही रामभरोसे  चाललेले आहे.मान्सूनपूर्व कामे हा डोळ्यांना पाणी लावण्याचा प्रकार आहे.

वीज पुरवठा खंडित असल्याने काल तर प्रत्येक लोक आपल्या टाकीतील पाणी काढताना दिसत होता. एक दिवस सर्व सहन करून पाणीपुरवठा खात्यात बिल भरणा करण्यास गेला, तर संबंधित कर्मचाऱ्याची सुट्टी, असे  प्रकार थांबले पाहिजे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकारात लक्ष घालून अशा कामचुकार कर्मचाऱ्यांना तंबी दिली पाहिजे, असे आमदार खंवटे यांनी सांगितले. कालच्या वादळामुळे  गृह विलगीकरणात असलेल्या लोकांचे खूप हाल झाले, कारण त्यांना वीज नाही म्हणून पाणी नाही. अजून वेरे, पिळर्णच्या काही भागात वीज पुरवठा ठप्प झाला आहे. वीज खात्याने लवकर ही समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com